मी - माझे कुटुंब : वारकरी आणि संगीत साधना
१८.मी - माझे कुटुंब : वारकरी आणि संगीत साधना
- कु.श्रद्धा नागरगोजे
मोठ्या संख्येने असलेल्या वारकरी संप्रदायातील माझे कुटुंब आणि आमच्यावर सतत संस्कार करणारे आणि वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारे माझ्या घरातील ज्येष्ठ माझे आजोबा धोंडीराम यांच्यामुळे घरात विठ्ठला प्रती भक्ती, प्रेम सर्वांच्या मनात आहे. माझ्या आजोबांना कित्येक अभंग मुखोद्गत असून तुकाराम महाराज, नाथ महाराज,संत ज्ञानेश्वर, अशा संतांचे ग्रंथ पारायण काकडा , आरती, हरिपाठ. पंढरपूरची दरवर्षी पायी वारी करणे हे त्यांच्या संपूर्ण जीवनाचा भाग असून.त्यांचे ही सेवा उल्लेखनीय आहे, पण याची नोंद कोणी जरी घेत नसले तरी मला वाटते संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराज या संतांवर निष्ठा असणारे असे माझ्या गावातील आणि वारकरी संप्रदायातील एक निष्ठावंत वारकरी म्हणजे माझे आजोबा आहेत. संत साहित्यावर त्यांची फार निष्ठा आहे. (https://youtu.be/pgGIccCRpHY?si=TPvjYXMrpOp8zPD0 तू माऊलीहुन मायाळ... मंत्रमुग्ध करणारे गायन Views : 21547)
या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे त्यांचा पुढे वारसा आम्ही नातवंडात चालवत आहोत. याचा आनंद त्यांना होतो. आमच्या मध्ये त्यांना आशा दिसते.
'संत प्रसाद योग' या नावावरून YouTube channel काढले.
मी व माझे वडील आणि छोटी बहीण यांच्या सोबत संतांच्या अनेक रचना सादर केल्या आहेत .त्यात गवळणी, स्पर्धेतील भजनाचे सादरीकरण या channel वर पहायला मिळते.पाच हजारच्या जवळपास subscribers आहेत. असून लोकांचा खूप चांगला प्रतिसाद भेटतो. घरात चालत असलेले नित्य आणि हरिपाठ ग्रंथ पारायण भजन कीर्तन यामुळे आम्हाला त्यामध्ये संगीत क्षेत्राकडे आमची आवड निर्माण झाली. हे आवर्जून सांगावं लागेल.
टाळ, मृदंग , हार्मोनियम, विना हे सर्व घरात आहेत. ते नेहमी भजन कीर्तनात आम्हाला सोबत घेऊन जायचे. हरिपाठच्या वेळेस नातवंडांना सोबत घेऊन जाऊन त्यांच्याकडून हरिपाठ म्हणून घेणे, टाळ वाजून घेणे,अभंग गाऊन घेणे याच्यामुळे आमच्या मनातही संगीताबद्दल आवड निर्माण झाली. जेव्हा आम्ही चांगले गाऊ लागलो, अभंग म्हणू लागलो, तेव्हा आजी-आजोबा आणि माझ्या वडिलांना वाटायचे की संगीत क्षेत्रातील चांगले नाव करू शकतात. त्यांना घरी सर्वच वाद्य उपलब्ध आहेत. त्यामुळे शास्त्रीय संगीत शिक्षण घेऊन योग्य मार्गाने संगीत शिकवून चांगल्या प्रकारे संगीताची साधना करण्याची प्रेरणात्यांनी दिली.(https://youtu.be/KHTOG07HzeY?si=gTZUQ_j9rC06Ezk2 जाऊ दे घट भरण्या यमुनेला ... दोन्ही बहिणीने अतिशय गोड आवाजात गाईलेले गौळण Views : 21746)
शास्त्रीय संगीतामुळे गाण्यात सौंदर्य, शास्त्रीय संगीताची ओळख आणि त्या दिशेने वाटचाल सुरू झाली. त्यामुळे जवळपास असलेली सर्व संगीत क्षेत्रातील व्यक्तींची , लोकांची, कलाकारांचे ओळख झाली. आशीर्वाद आणि प्रतिसाद मिळाला.
माझे वडील शास्त्रीय संगीत तबला या विषयांमध्ये संगीत विशारद असून मी आणि माझी छोटी बहीण ही सुद्धा संगीत विशारद आहोत.यासाठी सात वर्षाचा कालावधी लागतो. पण एवढे असूनही आमचे संगीत शिक्षण पुढे सुरू ठेवण्याचे काम माझ्या वडिलांनी केले. (https://youtu.be/MGtfxYejmm4?si=UthiFke6eR41YfEY पायलिया झंकार मोरी ... युवक महोत्सव ,लातूर शास्त्रीय गायन )
संगीत कला ही अशी कला आहे जी व्यक्तीला आध्यात्मिक बनवते. आणि आत्मिक समाधान देते.असा माझ्या वडिलांचा विश्वास आहे आणि म्हणून शिक्षणाबरोबरच संगीतकले एवढी दुसरी कोणतीही कला एवढी सुंदर नाही, असे त्यांचे मत होते.म्हणून त्यांनी आम्हाला संगीताचे शिक्षण दिले. संगीतामुळे मन आणि बुद्धी शांत राहते आणि शिक्षणात सुद्धा त्याचा उपयोग होतो असे त्यांचे मत होते. खरंच संगीतामुळे आम्हाला खूप प्रेम, मान सन्मान मिळाला. त्यातल्या त्यात वारकरी संप्रदायामध्ये संगीताचे महत्त्व असाधारणच आहे. त्यामुळे संगीताची आणि वारकरी संप्रदायाची सांगड घालता आली.
शिक्षणातून संस्कार होतातच, पण त्याचबरोबर एक आध्यात्मिक वातावरण,आत्म्याचे परमात्म्याशी असलेले नाते, जगण्याची दिशा, संतांचे विचार, आणि त्या मार्गाने वैयक्तिक पातळीवर नैतिकतेने जीवन कसे जगायचे? याचे संस्कार त्यांच्याकडून मिळाले .त्यामुळे माझ्या कुटुंबातील वारकरी संप्रदायाची परंपरा आणि त्यातल्या त्यात संगीताच्या वातावरणामुळे एक सकारात्मक ऊर्जा आणि आत्मिक समाधान मिळते.असे वाटते कधी कधी चांगले कुटुंब, संस्कार आणि असे वातावरण मिळणे हे नशीब लागते . माझ्या पूर्वपुण्यमुळे असे कुटुंब मला लाभले.तुम्हाला जे काही मिळाले हे सर्व विठ्ठलाच्या कृपेने मिळाले असून संसारिक जीवनामध्ये कुठलीच कमी त्याने ठेवली नाही. त्यामुळे त्या विठ्ठलाचे नाव दिवस रात्र घेत जीवन जगणे यातच खरे समाधान वाटते.
- कु.श्रद्धा बालाजी नागरगोजे
बी.ए.तृतीय वर्ष२०२५ - २६
समन्वयक : डॉ.म.ई.तंगावार ९८९००६५६९०
सहसमन्वयक : प्रा.व्ही.जी. बिरादार, प्रा.जे.डी.संपाळे

.jpeg)
.jpeg)
.jpeg)




ग्रामीण भागात राहून संगीत क्षेत्रात कु.श्रद्धा बालाजी नागरगोजे यांनी केलेली साधना कौतुकास्पद आहे. संगीत माणसाला आनंद व आत्मिक समाधान देते. वारकरी संप्रदायाच्या घराण्यात ,परंपरेत जडणघडण झालेल्या श्रद्धाचे संपूर्ण घर संगीतमय आहे. आपल्या गोड आवाजाद्वारे अनेकांना आनंद देणाऱ्या श्रद्धाचे, तिच्या बहिणीचे आणि सतत तबल्याची साथ देत प्रेरणा देणाऱ्या श्रद्धाच्या वडिलांचे मनःपूर्वक अभिनंदन!
ReplyDeleteछान. खूप खूप अभिनंदन.💐💐
DeleteKhup chhan
ReplyDeleteखूप खूप अभिनंदन श्रद्धा 💐
ReplyDeleteखूप छान 👍