मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि युवकाची भूमिका
९. मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि युवकाची भूमिका - कु.रेणुका जाधव १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले,परंतु काही संस्थाने हे भारतात समाविष्ट होण्यास तयार नव्हते.त्यातील एक संस्थान म्हणजे हैदराबाद .या संस्थानावर निजामाचे राज्य होते . मराठवाड्यातील काही भाग हा हैदराबाद यामध्ये समाविष्ट होता.परंतु हे संस्थान भारतामध्ये समाविष्ट होत नव्हते.निजाम हा हैदराबाद या संस्थानाला सोडण्यास तयार नव्हता. अनेकांनी वेगवेगळ्या चळवळीद्वारे निजामाचा पराभव करण्याचा प्रयत्न केला.निजाम मात्र ऐकतच नव्हता. तो हे संस्थान सोडून जात नव्हता. आपल्या भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी ' ऑपरेशन पोलो ' याद्वारे लष्करी कार्यवाही केली.ही कार्यवाही १३ सप्टेंबर १९४८ ला सुरू झाली . यामुळे निजामाचा पराभव झाला व तो शरण गेला.त्यानंतर १७ सप्टेंबर १९४८ ला हैदराबाद या संस्थानाचा समावेश भारतात झाला.मराठवाडा मुक्तीसंग्राम हे एखाद्या पर्वासारखेच होते . ...