Posts

Showing posts from February, 2023

माझ्या गावातील नदीची आत्मकथा

Image
  २.माझ्या गावातील नदीची आत्मकथा -  ऐश्वर्या कांबळे               ( शेषनदी मौ.शेल्हाळ ता.उदगीर )                                              होय , मी नदीच बोलते. मी शेल्हाळ या गावतील नदी आहे. माझे नाव शेषनदी आहे. मी शेल्हाळ या गावात वाहते. माझे आकार फार मोठे नाही. उदगीर पासून शेल्हाळ या गावाचे अंतर सहा किलोमिटर  आहे. शेल्हाळ या गावातील लोकसंख्या २०१२  च्या जनगणनेनुसार  २४७३ आहे. मी शेषनदी या नावाने का ओळखले जाते ? तर त्याला एक कारण आहे.                           मी शेल्हाळ या गावातून वाहत असतांना लोक माझ्यात कचरा टाकत आणी कपडे धुवत असत. पण गावतील शेषाबाई  नावाची एक महिला लोकांना समजावून सांगायची आणी पाणी हेच जीवन आहे, अशा प्रकारे लोकांना समजावून सांगत असे. म्हणून मला शेषनदी असे नाव देण्यात आले. शेषाबाई नावाची महिला माझी जागा खराब होऊ देत न...