कोरोनाकाळ आणि माझं गाव
१. कोरोनाकाळ आणि माझं गाव : कु. अक्षिता नरवटे मार्च महिन्यात २०१९ मध्ये आमचे कॉलेज सकाळच्या सत्रात भरू लागले होते. एके दिवशी सरांनी आम्हाला सांगितले की, कोरोनामुळे तुम्हा सर्वांना सुट्टी मिळेल. तेव्हा आम्ही विद्यार्थी फारच गोंधळलो. आणि अभ्यासाच्या टेन्शनने परेशान झालो. हा नवीन विषाणू आल्याने आम्ही फारच अस्वथ झालो.सुट्ट्या लागल्यास असे वाटायचे की, आता अभ्यास नसल्याने मुक्त झालोत. अभ्यासाची गरज नाही. रट्टा पट्टा नाही. पण असे करून कसे चालणार? आमच्या भविष्याचे काय होणार असे विचार मनामध्ये येत होते. ही महामारी तर हात धुऊन आमच्या मागे पडलेली. आम्हाला घरच्या बाहेर कोठेच जाता येत नव्हता.' ना मामाचं गाव ना मावशीचं गाव गप्प बसा घरचा खात.'अशी कथा झाली होती. शहरात राहणाऱ्या लोकांची गावाकडे जाण्याची गर्दी गोंधळ अशाने हा विषाणू मोठ्या भरभराटीने वाढू लागला होता. महाराष्ट्रात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने व नंतर त्यात वाढ झाल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य सरकारने शाळा कॉलेजेस महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला.२२ मार्च २०१८ रोजी आप...