द रियल हिरो : डॉ प्रकाश आमटे
७. द रियल हिरो : डॉ प्रकाश आमटे - अभिषेक ऐनिले मला डॉ.प्रकाश आमटे यांच्या जीवनाबद्दल माहीत नव्हते.मी जेव्हा प्रकाश आमटे 'द रियल हिरो' हे पुस्तक वाचन केलो तेव्हा मला त्यांचे जीवन समजले. डॉ.प्रकाश आमटे हे एक डॉक्टर म्हणून खऱ्या आर्थाने सुसज्ज आहेत असे मी म्हणेन. कारण १००% पैकी ९०% लोक तर पैसा कमवने हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन डॉक्टरी पेशा स्वीकारतात. परंतु डॉ.बाबा आमटे यांचे सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे यांनी फक्त आपण पैसे कमवावे आणि खूप श्रीमंत व्हावे हा उद्दिष्ट डोळ्यासमोर न ठेवता आपण डॉक्टरी पेशा स्वीकारावा आणि आदिवासी भागात असलेल्या आदिवासी लोकांची सेवा करावी यासाठी त्यांनी हा पेशा स्वीकारला. डॉ. प्रकाश आमटे 'द रियल हिरो' हे पुस्तक किरण सोनार यांनी लिहिले आहे. लेखक किरण सोनार यांनी ड...