मी - माझे कुटुंब : वारकरी आणि संगीत साधना

 १८.मी - माझे कुटुंब : वारकरी आणि संगीत साधना

                                        -  कु.श्रद्धा नागरगोजे 


         


      वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील एक छोटेसे गाव होनीहीप्परगा येथे मी आणि माझे कुटुंब राहतो.कुटुंबात एकूण बारा सदस्य आहेत.त्यात माझे आजोबा धोंडीराम नागरगोजे, माझी आज्जी सुलोचनाबाई, माझे काका परमेश्वर नागरगोजे,त्यांची पत्नी ज्योती नागरगोजे, माझे वडील बालाजी नागरगोजे आणि आई श्रीदेवी तसेच माझे छोटे बंधू काकाचे दोन मूलं, छोटी बहीण श्रुतिका नागरगोजे आणि मी श्रद्धा घरातील सर्वात मोठी मुलगी असे माझे कुटुंब आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत ज्या संप्रदायाचे खूप मोठे योगदान आहे, त्या वारकरी संप्रदायाच्या घरात जन्म झाला हे माझं नशीब समजते. महाराष्ट्र संतांच्या आणि लाखो विठ्ठल भक्तांच्या पावलांनी पावन झालेली भूमी आहे.

                   मोठ्या संख्येने असलेल्या वारकरी संप्रदायातील माझे कुटुंब आणि आमच्यावर सतत संस्कार करणारे आणि वारकरी संप्रदायाची परंपरा जपणारे माझ्या घरातील ज्येष्ठ माझे आजोबा धोंडीराम यांच्यामुळे घरात विठ्ठला प्रती भक्ती, प्रेम सर्वांच्या मनात आहे. माझ्या आजोबांना कित्येक अभंग मुखोद्गत असून तुकाराम महाराज, नाथ महाराज,संत ज्ञानेश्वर, अशा संतांचे ग्रंथ पारायण काकडा , आरती, हरिपाठ. पंढरपूरची दरवर्षी पायी वारी करणे हे त्यांच्या संपूर्ण जीवनाचा भाग असून.त्यांचे ही सेवा उल्लेखनीय आहे, पण याची नोंद कोणी जरी घेत नसले तरी मला वाटते संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराज या संतांवर निष्ठा असणारे असे  माझ्या गावातील आणि वारकरी संप्रदायातील एक निष्ठावंत वारकरी म्हणजे माझे आजोबा आहेत. संत साहित्यावर त्यांची फार निष्ठा आहे. (https://youtu.be/pgGIccCRpHY?si=TPvjYXMrpOp8zPD0  तू माऊलीहुन मायाळ... मंत्रमुग्ध करणारे गायन Views : 21547)

       


         प्रत्येक परिस्थितीमध्ये तब्येत बरोबर नसताना सुद्धा  जीवनभर साथ देणारी त्यांची अर्धांगिनी म्हणजे माझी आज्जी सोबत असते. गावात सायंकाळचा हरिपाठ, रात्रीचे भजन. पहाटेचा काकडा, गाथा पारायण हे त्यांच्या नित्याच्या जीवनाचा भाग बनले आहे. आजी-आजोबांपासून वारकरी संप्रदायाप्रती प्रेम, निष्ठा आणि आवड तयार झाली. आजोबा- पंजोबा त्यांचा वारसा पुढे चालवण्याची आणि घरात पायीवारी,नित्य हरिपाठ,भजन, कीर्तन याची परंपरा आणि वारसा माझ्या आजोबांनी पुढे चालवला आणि त्या पुढे माझ्या वडिलांनी आणि त्यांच्याकडू आम्हाला. त्याच परंपरेत जगण्याचा आनंद आणि अभिमान आहे."कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक। तयाचा हरिक वाटे देवा।"

            या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे त्यांचा पुढे वारसा आम्ही नातवंडात चालवत आहोत. याचा आनंद त्यांना होतो. आमच्या  मध्ये त्यांना आशा दिसते. 

             'संत प्रसाद योग' या नावावरून YouTube channel काढले.

(https://youtu.be/_zQ7A2WkW_o?si=YP9hbvtY8HYO879t अरे कान्हा कृष्ण मुरारी... Views : 2,82,847)
  मी व माझे वडील आणि छोटी बहीण यांच्या सोबत संतांच्या अनेक रचना सादर केल्या आहेत .त्यात गवळणी, स्पर्धेतील भजनाचे सादरीकरण या channel वर पहायला मिळते.पाच हजारच्या जवळपास subscribers आहेत. असून लोकांचा खूप चांगला प्रतिसाद भेटतो. घरात चालत असलेले नित्य आणि हरिपाठ ग्रंथ पारायण भजन कीर्तन यामुळे आम्हाला त्यामध्ये संगीत क्षेत्राकडे आमची आवड निर्माण झाली. हे आवर्जून सांगावं लागेल.

           


         संगीत क्षेत्राकडे वळण्याचे कारण म्हणजे घरात होत असलेले अभंग, संतांची वाणी हे आहे. त्याचबरोबर कुटुंबाला एकत्र ठेवण्याचे आणि एका सूत्रात बांधून ठेवण्याचे काम माझ्या आजी-आजोबांनी आणि त्यांच्या संस्कारांनी केले आहे. माझे वडील आणि माझे चुलते सर्वजण एकत्र कुटुंबात राहतो. तरीसुद्धा कुठले मतभेद होत नाहीत.कारण घराची चौकट असणारे म्हणजे आजोबा आणि घराची आगळ म्हणजे माझी आजी. यांच्यामुळे सर्वांमध्ये प्रेमाची भावना टिकून आहे. त्यांच्या पुण्याईमुळे आणि निष्ठावंत वारकरी म्हणून जीवनभर करत असलेल्या सेवेमुळे हे शक्य झाले.
(https://youtu.be/kWfyEiesPWw?si=Lp_6_QWK35d1wu0q अभिजात काव्य पाठांतर स्पर्धा प्रथम पारितोषिक )

                   टाळ, मृदंग , हार्मोनियम, विना हे सर्व घरात आहेत.  ते नेहमी भजन कीर्तनात आम्हाला सोबत घेऊन जायचे. हरिपाठच्या वेळेस नातवंडांना सोबत घेऊन जाऊन त्यांच्याकडून हरिपाठ म्हणून घेणे, टाळ वाजून घेणे,अभंग गाऊन  घेणे याच्यामुळे आमच्या मनातही संगीताबद्दल आवड निर्माण झाली. जेव्हा आम्ही चांगले गाऊ लागलो, अभंग म्हणू लागलो, तेव्हा आजी-आजोबा आणि माझ्या वडिलांना वाटायचे की संगीत क्षेत्रातील चांगले नाव करू शकतात. त्यांना  घरी सर्वच वाद्य उपलब्ध आहेत. त्यामुळे शास्त्रीय संगीत शिक्षण घेऊन योग्य मार्गाने संगीत शिकवून चांगल्या प्रकारे संगीताची साधना करण्याची प्रेरणात्यांनी दिली.(https://youtu.be/KHTOG07HzeY?si=gTZUQ_j9rC06Ezk2 जाऊ दे घट भरण्या यमुनेला ... दोन्ही बहिणीने अतिशय गोड आवाजात गाईलेले गौळण Views : 21746)

        शास्त्रीय संगीतामुळे गाण्यात सौंदर्य, शास्त्रीय संगीताची ओळख आणि त्या दिशेने वाटचाल सुरू झाली. त्यामुळे जवळपास असलेली सर्व संगीत क्षेत्रातील व्यक्तींची , लोकांची, कलाकारांचे ओळख झाली. आशीर्वाद आणि प्रतिसाद मिळाला. 

               माझे वडील शास्त्रीय संगीत तबला या विषयांमध्ये संगीत विशारद असून मी आणि माझी छोटी बहीण ही सुद्धा संगीत विशारद आहोत.यासाठी सात वर्षाचा कालावधी लागतो. पण एवढे असूनही आमचे संगीत शिक्षण पुढे सुरू ठेवण्याचे काम माझ्या वडिलांनी केले. (https://youtu.be/MGtfxYejmm4?si=UthiFke6eR41YfEY पायलिया झंकार मोरी ... युवक महोत्सव ,लातूर शास्त्रीय गायन )

                    संगीत कला ही अशी कला आहे जी व्यक्तीला आध्यात्मिक बनवते. आणि आत्मिक समाधान देते.असा माझ्या वडिलांचा विश्वास आहे आणि म्हणून शिक्षणाबरोबरच संगीतकले एवढी दुसरी कोणतीही कला एवढी  सुंदर नाही, असे त्यांचे मत होते.म्हणून त्यांनी आम्हाला संगीताचे शिक्षण दिले. संगीतामुळे मन आणि बुद्धी शांत राहते आणि शिक्षणात सुद्धा त्याचा उपयोग होतो असे त्यांचे मत होते. खरंच संगीतामुळे आम्हाला खूप प्रेम, मान सन्मान मिळाला. त्यातल्या त्यात वारकरी संप्रदायामध्ये संगीताचे महत्त्व असाधारणच आहे. त्यामुळे संगीताची आणि वारकरी संप्रदायाची सांगड घालता आली.

                     


   संगीताचे वेगवेगळे गायनाचे कार्यक्रम , भजन स्पर्धा करत अनेक कार्यक्रम सादर केले.अनेक नामवंत मोठे कलाकार रघुनाथ खंडाळकर, कल्याणजी गायकवाड अशा कलाकारांकडून पारितोषिक आणि आशिर्वाद मिळाला. राज्यस्तरीय वारकरी भजन स्पर्धा यामध्ये प्रथम क्रमांकाची पारितोषिक जिंकले. अनेक स्पर्धेमध्ये भाग घेऊन यशस्वी झालो. याचा आनंद माझ्या आई-वडिलांना तर होतोच,पण त्यातल्या त्यात आजी-आजोबांना असे वाटते की आपण केलेले प्रयत्न, भक्ती ,सेवा फळाला आली. आम्हाला मिळालेला सन्मान, लोकांचे प्रेम हे पाहून अभिमान वाटतो. त्यांचा आनंद त्यांच्या डोळ्यात दिसतो. जेव्हा आम्ही जिंकलेले बक्षीस आणि सादर केलेले कार्यक्रम ऐकतात आणि लोकांनी केलेले कौतुक ऐकून त्यांचे मन भरून येते.लहानपणापासूनच सर्वांचे हृदयामध्ये संतांबद्दल प्रेम, विश्वास आणि त्यांची वचने यावर श्रद्धा ठेवून जीवन जगण्याची संस्कार घरातील प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवण्याची काम त्यांनी केले. कुटुंबातील एक सकारात्मक वातावरण, एकमेकांबद्दल आदर, विश्वास, निर्माण करण्याचे  श्रेय त्यांना देते. मला वाटते जे काही आम्हाला साध्य झाले किंवा जे काही आम्ही मिळवलं ते आमचे नसून माझ्या आजी-आजोबांचे पुण्य आहे.

              शिक्षणातून संस्कार होतातच, पण त्याचबरोबर एक आध्यात्मिक वातावरण,आत्म्याचे परमात्म्याशी असलेले नाते, जगण्याची दिशा, संतांचे विचार, आणि त्या मार्गाने वैयक्तिक पातळीवर नैतिकतेने जीवन कसे जगायचे? याचे संस्कार त्यांच्याकडून मिळाले .त्यामुळे माझ्या कुटुंबातील वारकरी संप्रदायाची परंपरा आणि त्यातल्या त्यात संगीताच्या वातावरणामुळे एक सकारात्मक ऊर्जा आणि आत्मिक समाधान मिळते.असे वाटते कधी कधी चांगले कुटुंब, संस्कार आणि असे वातावरण मिळणे हे नशीब लागते . माझ्या पूर्वपुण्यमुळे असे कुटुंब मला लाभले.तुम्हाला जे काही मिळाले हे सर्व विठ्ठलाच्या कृपेने मिळाले असून संसारिक जीवनामध्ये कुठलीच कमी त्याने ठेवली नाही. त्यामुळे त्या विठ्ठलाचे नाव दिवस रात्र घेत जीवन जगणे यातच खरे समाधान वाटते. 

               

                                        -  कु.श्रद्धा बालाजी नागरगोजे

                                                        बी.ए.तृतीय वर्ष 

                                                                       २०२५ - २६

                                                            


समन्वयक : डॉ.म.ई.तंगावार ९८९००६५६९०

सहसमन्वयक : प्रा.व्ही.जी. बिरादार, प्रा.जे.डी.संपाळे

Comments

  1. ग्रामीण भागात राहून संगीत क्षेत्रात कु.श्रद्धा बालाजी नागरगोजे यांनी केलेली साधना कौतुकास्पद आहे. संगीत माणसाला आनंद व आत्मिक समाधान देते. वारकरी संप्रदायाच्या घराण्यात ,परंपरेत जडणघडण झालेल्या श्रद्धाचे संपूर्ण घर संगीतमय आहे. आपल्या गोड आवाजाद्वारे अनेकांना आनंद देणाऱ्या श्रद्धाचे, तिच्या बहिणीचे आणि सतत तबल्याची साथ देत प्रेरणा देणाऱ्या श्रद्धाच्या वडिलांचे मनःपूर्वक अभिनंदन!

    ReplyDelete
    Replies
    1. छान. खूप खूप अभिनंदन.💐💐

      Delete
  2. खूप खूप अभिनंदन श्रद्धा 💐
    खूप छान 👍

    ReplyDelete

Post a Comment