ऐतिहासिक खरोसा लेण्या

 १७. ऐतिहासिक खरोसा लेण्या  -  अश्विनी देशपांडे 

    

दगडात कोरली कला , इतिहासाची ती कहाणी     

खरोशा च्या लेण्यात दडली , संस्कृतीची निशाणी !    

शतकाची  साक्ष देत उभी , परंपरेची ही शान ,    

आपला वारसा जपूया सारे , हाच करूया प्रण!     

    

                       लातूरच्या भूमीतील ऐतिहासिक वारसा, असलेली खरोसा लेणी ! लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील खरोसा गावाजवळील एका टेकडीवर स्थित असून, ती सहाव्या व नव्या शतकातील बारा प्राचीन गुहांचा समूह आहे. या एकूण बारा गुहा आहेत, ज्या जांभ्या दगडाच्या टेकडीवर कोरलेल्या आहेत.यातील बहुतांश लेण्या  हिंदू धर्माशी संबंधित आहेत,तर एक लेणी बौद्धधर्मीय आहे.या लेण्या दोन मजली आहेत .    

                      प्रभू रामचंद्र यांचे वास्तव्य असलेली खरोसा लेणी, खरोसा नगरी हा भाग दंड करणाचा भाग आहे असे म्हणले जाते .याची लांबी दक्षिण उत्तर दीड किलोमीटर आहे.आणि रुंदी पूर्व पश्चिम एक किलोमीटर आहे .या लेणीला दक्षिण टोकाला एक भोगदा आहे. त्या टोकाला जुन्या भाषेत भगाड असे म्हणत, पण ते भगाड नसून तो भोगदा आहे व त्याची लांबी दीड किलोमीटर आहे. मेन दार त्याचे दक्षिण टोकाला आहे.रेणुका देवीच्या मंदिराच्या खालच्या बाजूला सभामंडप आहे. ते ऋषीमुनींचे तपश्चर्येचे व सामूहिक वास्तव्याचे ठिकाण होते ,असे म्हणले जाते. या खरोसा लेण्यातील दोन मजली लेणीमध्ये तळमजल्यात बारा ज्योतिर्लिंगाचे अनुष्ठान आहे, व दुसऱ्या मजल्यावर दक्षिण बाजूस हनुमान,  राम, सीता व लक्ष्मणाचे आपल्याला प्रत्यक्ष मूर्ती प्रतिमाचे  दर्शन होते.व उत्तर बाजूस निळकंठेश्वराचे म्हणजेच सदाशिवाचे दर्शन होते .    

                          एका जांबा खडकाच्या डोंगराच्या मध्यावर ही लेणी कोरण्यात आलेली आहे .डोंगराच्या दुसऱ्या बाजूस रेणुका देवीचे मंदिर आहे. पहिली लेणी ही बुद्धाची गुहा आहे.त्यापैकी एकामध्ये भगवान दत्ताचे शिल्प आहे.तर इतर काही लेण्यांमध्ये शिवपार्वती, नरसिंह, कार्तिकी इत्यादींचे आहे.असे अनेक देवतांचे स्थान असलेल्या या लेण्या म्हणजेच खरोसा लेण्या.या लेण्यांमध्ये  ३३ कोटी देवांचा वास आहे. चौथ्या आणि पाचव्या लेणीमध्ये दोन मजले  आहेत , आणि तळमजला जमिनीच्या पातळीच्या अगदी खाली बांधला आहे.जिथे दुसऱ्या मजल्यावर जाता येते, बऱ्याच लेण्यांमध्ये मोठ मोठी शिवलिंग दिसतात. लेण्यामध्ये पौराणिक  कलाकृती कोरलेल्याआहेत.खडक हा फार मजबूत नसल्याने काळाच्या ओघात लेण्याची बरीच झीज झालेली आहे. सध्या काहीशाच कलाकृती या व्यवस्थित दिसतात. या लेण्याची निर्मिती  अंदाजे ५००  ते ७००  च्या दरम्यान झाल्याचे मानले जाते. तरीही तेथील मूर्ती ऐतिहासिक महत्त्व टिकून आहे    


                       प्रभू रामचंद्राने या भागातून ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या त्यांची तपश्चर्याभंग करणाऱ्या दृष्ट प्रवृत्तीच्या राक्षसास येथून जाण्याचे  दंडक लावले ,म्हणूनच या भागास दंडक आरण्य असे नाव पडले. प्रभू रामचंद्र व सीतामाईचे वास्तव्य, रावणाचे भाचे खर ,दुषण व त्रिशरा येथे राहत असत, त्यांना ही प्रभू रामचंद्राने येथून जाण्याबद्दल सांगितले.यामुळे खर या नावामुळेच या नगरीचे नाव खरोसा असे पडले. येथे शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने तसेच ऋषीमुनींच्या या भूमीमध्ये प्रभू रामचंद्राने रेणुका मातेची स्थापना केली .येथे चालुक्य काळातील शिलालेख व ताम्रपट  आढळून येतात.तसेच रावळ, कार्तिके, नरसिंह ,शिवपार्वती ,राम व सीता यांच्या कोरीव प्रतिभा भिंतीवर कोरलेल्या आहेत.   

         


                डोंगराच्या पश्चिमेकडील भागात कोरूण तयार केलेले २४ उभे खांब असलेले विष्णूबमंदीर आहे.मंदिराच्या मुख्य प्रवेशदाराच्या अगदीच जवळ श्रीविष्णु देवाची उभारलेल्या अवस्थेतील अगदी तेजोमय  अशी मूर्ती आहे.विष्णू देवाच्या बाजूच्या लेणीत सुंदर अशी महादेवाची मोठी पिंड आहे. मोठ्या जायीचे कलाकुसर करून कोरलेले भरपूर समांतर खांब असलेली विशिष्ट पद्धतीने कोरलेली लिहिली आहे. या लेणीमध्ये स्वतंत्र असा कोरीव गाभारा असून ,त्या गाभाऱ्यामध्ये भव्य अशी महादेवाची पिंड आहे. महादेवाची लेणी फारच आकर्षक व विलोभनीय आहे. पूर्वीच्या काळातील देवाधिकाचे अवतार व निरनिराळ्या प्रसंगाची आठवण हुबेहूब भिंतीवर कोरलेली आहे .  असे म्हणले जाते की या नगरीच्या डोंगर पोटात असलेली ऋषी गुफा व यामधील असलेल्या ऋषीमुळींच्या जप तक व वास्तव्याने पुणीत हे ठिकाण आहे. यामुळे येतील 33 कोटी देवदेवंतांच्या दर्शनाने  संपूर्ण चारधाम यात्रा पूर्ण केल्यासारखे होते, असे म्हटले जाते.असे हे भारतातील दुर्लक्षित परंतु अति महत्त्वाचे असे ठिकाण विशेष गुढ आहे. 

 

                          लेण्या पाहिल्यानंतर खरंतर मला त्या प्राचीन भारतीय शिल्पकलेचा अनुभव आला .त्या मुख्यत्वे ,हिंदू आणि बौद्ध संस्कृतीचा अद्भुत संगम पाहिला मिळतो. या बारा गुहांमधील नरसिंह, शिव- पार्वती आणि लेण्यावरील कोरीव काम पाहिल्यानंतर, त्या काळातील वास्तुकलेच्या भव्यतेमुळे माणूस थक्क होतो.ऐतिहासिक कलाकुसर व तीर्थकारच्या मूर्ती पण तेथे आहेत.त्यातील कोरीव काळ पाहण्यासारखे आहे .डोंगरावर स्थित असलेल्या लेण्या  तिथले शांत वातावरण मनाला प्रसन्न करणारे आहे. या लेण्या पाहिल्यानंतर प्राचीन शिल्पकाराच्या कौशल्याची जाणीव होते .    

                       मला असे वाटते की,त्या लेण्याची  देखभाल करण्यासाठी तिथे कोणीतरी पाहिजे .जेव्हा मी त्या लेण्या पाहायला गेले त्यावेळेस मला तिथे अस्वच्छता जाणवली.त्या लेण्याला जेंव्हा मी हात लावला त्यावेळेस त्यामधून  माती पडत होती ,मला असे जाणवले की त्या  लेण्याची  झीज होत आहे .मी ज्या वेळेस  लेण्या मध्ये  गेले ,त्यावेळेस तिथे मला उग्र वास आला. लेण्यामध्ये  खूप घाण, व धूळ  होती ,व आजूबाजूला पण खूप घाण होती .त्यातील जे चित्रे ,मूर्ती  व लेण्यावरचे कोरीव काम केलेले आहे, त्याची पण झीज होत चाललेली आहे .खरंतर आपणच हा ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे लेण्या असो वा किल्ले याची देखभाल केली पाहिजे,  तिथे स्वच्छता ठेवली पाहिजे लेण्याची जर स्वच्छता केली तिचे जे काम आहे, जसे की लेण्याची झीज होताना दिसते तर त्याचे पण काम केले पाहिजे. त्याचा आजूबाजूचा  पण परिसर स्वच्छ केला पाहिजे. जेणे करून तो स्वच्छ दिसेल .तेथे जो उग्र वास येतो त्यासाठी पण तिथे स्वच्छता केली पाहिजे .आपणच आपली संस्कृती जपली पाहिजे. जेणेकरून आपल्या पिढीला पण त्याचे महत्त्व समजेल. 

           


                 लेण्याचे जतन करणे हे, आपल्या समृद्ध  व ऐतिहासिक वारशाचे रक्षण करण्यासाठी व सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी आणि भावी पिढ्यांपर्यंत आपली प्राचीन कला व संस्कृती पोहोचवण्यासाठी आवश्यक आहे. या कलाकृती ऐतिहासिक धार्मिक महत्त्व असलेल्या अमूल्य ठेवा आहेत.या पर्यटनाला चालना देतात.ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा या लेण्यांमध्ये दिसून येतो .या लेण्या हजारो वर्षांपूर्वीच्या मानवी संस्कृती ,कला ,आणि कारागिरीची साक्ष देतात. त्याचे जतन केल्याने आपल्या पूर्वजांचा इतिहास हा जिवंत राहतो. कला आणि वास्तुकलेचा ठेवा, या लेण्यांमध्ये दिसतो. प्राचीन शिल्पे स्थापत्य आणि चित्रे आहे जी अत्यंत दुर्मिळ आहेत .  

              विद्यार्थी -संशोधक आणि पर्यटकांसाठी हे अभ्यासाचे उत्तम साधन आहे.यातून प्राचीन काळातील जीवनमान समजते. या पुरातत्वीय लेण्यामुळे त्यांच्या नैसर्गिक सेटिंग मध्ये जतन करणे ही काळाची गरज आहे ,यामुळे नैसर्गिक परिसंस्थेचेही संरक्षण होते .या भावी पिढ्यांसाठी वेगाने बदलणाऱ्या जगात ओळख आणि सातत्य देण्याची भावनाप्रधान करते.खरोसा येथील लेण्याचे अभ्यासक मा.श्यामसुंदर पाटील यांनी सहलीतील आम्हा सर्वाना मोलाचे मार्गदर्शन केले.त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते.

             आपल्या महाराष्ट्रातील गड, किल्ले, लेण्या या इतिहासिक स्थळे इतिहासातल्या त्या पराक्रमी शौर्य गाथेची ओळख करून देतात.शाळेत असताना सुद्धा आपल्याला या शिवकालीन किल्ल्याची व लेण्याची माहिती व्हावी म्हणून ,शाळेची सहल अशाच  ऐतिहासिक स्थळांवर जात असे . या ऐतिहासिक स्थळाचे पावित्र्य जपायला मात्र अनेक जण विसरतात.आपल्यापैकी किती जण या ऐतिहासिक स्थळावर जाऊन त्या भव्य अशा वस्तूची व्यवस्थित पाहणी करतात.आपल्याला या संस्कृतीचे दर्शन यातून मिळत असते, वेगवेगळ्या कला, चित्र, राजा, महाराजांच्या प्रतिकृती ,प्राण्याचे चित्र जुन्या काळातील अवशेषांचे महत्त्व या, ऐतिहासिक वस्तू मधून आपल्याला ते दिसून येते.त्यामुळे या सांस्कृतिक वारशाचे संरक्षण करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे .

                                        

                                      अश्विनी देशपांडे 

                   बी.ए.प्रथम वर्ष २०२५-२६ 

   
                                                                                                                                                                                    

 

समन्वयक : डॉ.म.ई.तंगावार ९८९००६५६९०

सहसमन्वयक : प्रा.व्ही.जी. बिरादार, प्रा.जे.डी.संपाळे                                                         

                                                    

Comments

  1. खरोसा लेण्यावर अभ्यासपूर्ण लेख लिहिल्याबद्दल अश्विनी देशपांडे यांचे हार्दिक अभिनंदन!

    ReplyDelete
    Replies
    1. खारोसा लेणी विषयी सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक अंगाने खूप जाणीवपूर्वक खूप सुंदर ब्लॉग लिहील्या बद्दल कु. अश्विनी देशपांडे व मार्गदर्शक डॉ. म.ई. तंगावार सर यांचे मनपूर्वक अभिनंदन.💐💐

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
  2. आपल्या लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील दुर्मिळ अशा खरोसा लेण्यानविषयी सविस्तर अभ्यास पूर्ण लेख लिहिल्याबद्दल अश्विनी ताईचे मनःपूर्वक खूप खूप आभार मनःपूर्वक खूप खूप हार्दिक अभिनंदन.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

रवी बापटले यांचे एड्स ग्रस्तांसाठीचे सेवालय

Lucky : A Special Member of Our Family