' न उमजलेला पुरुष ' माझ्या नजरेतून

 १५. ' न उमजलेला पुरुष ' माझ्या नजरेतून 

                                   - कु.शुभांगी बिरादार

 प्रस्तावना :

           'स्त्री ही समाजाचा आत्मा आहे.' अस आपण अनेकदा ऐकतो. पण तो आत्मा ज्या देहात असतो, त्या पुरुषाच्या अस्तित्वाकडे आपण कितीदा लक्ष दिलंय? समाजात स्त्रियांसाठी अनेक योजना, दिवस, चर्चा होतात- होणंही गरजेचं आहे. पण पुरुषांसं मन, त्यांची जबाबदारी, त्याचं दुःख, त्यांचं श्रमाचं मूल्य याबाबत आपल्याला फारसं काही आठवतं का?

लेखिका ...                       
 ' न उमजलेला पुरुष ' या पुस्तकांची लेखिका माझी मैत्रीण श्वेता हुनसनाले म्हणजे शांततेत विचारांचा गहिरा प्रवाह. लायब्ररीत तिला पाहिलं की लक्षात येतं, ज्ञानासाठीची जिद्द काय असते. तीच वाचन, सततचा अभ्यास, आणि मनातून विचार करून लिहिण्याची शैली- हे सगळं आम्हाला खूप प्रेरणा देतं. तिच्याकडून मला शिकायला मिळालं की शब्द ही केवळ मांडणी नसून, अनुभव आणि समजुतीचं प्रतिबिंब असतं. तिच्यासारखं विचार करणं ही एक कला आहे- आणि ती तिच्याकडून नकळत शिकली जाते. 

ग्रंथाच्या शीर्षकाविषयी : 

           


    आमच्या कॉलेजमधील विद्यार्थिनी संजीवनी सोनकांबळे हिने न उमजलेला पुरुष या ग्रंथाच्या मुखपृष्ठाचे केलेले रेखाटन बोलके आहे. "शब्दांनाही ओळख मिळाली, जेव्हा चित्रातून कला बोलू लागली! संजीवनीच्या हृदयातील प्रतिभा, मुखपृष्ठावर अविस्मरणीय ठरली!!" 

                  ' न उमजलेला पुरुष ' हे शीर्षक वाचताना आपल्या मनात लगेचच एक प्रश्न निर्माण होतो. पुरुष खरच न उमजतो का? या प्रश्नांमध्येच या पुस्तकाची मूळ कल्पना लपलेली आहे. 'न उमजणारा पुरुष' हे शीर्षक बोलकं ठरतं. हे शीर्षक फक्त त्यांच्या व्यक्त न झालेल्या भावना सांगत नाही, तर समाजाच्या त्या मानसिकतेवरही बोट ठेवतं.जिथे पुरुषांना भावनाच दाखवू दिल्या जात नाहीत. लेखिकीने या पुस्तकामध्ये काही मुद्दे स्पष्ट केलेली आहेत.                                         


१.नेहमी पुरुषचं दोषी का? २.पुरुषांच्या जबाबदारी, स्त्रियांचा सन्मान ३.कामाची किंमत आणि वर्गवारी

४.सुविधा, योजना, सन्मान- फक्त स्त्रियांना का? ५. स्त्रिया भोळ्या, मग पुरुष? 

लेखिकेचं हे लिखाण पुरुषांच्या बाजूने तक्रार म्हणून नाही, तर सामाजिक समतेचा विचार म्हणून समोर येतं. 

न उमजलेलं पुरुष हा फक्त एक ग्रंथ नाही, तर तो पुरुषांच्या अंतर्मनातील वेदनेच शब्दबद्ध चित्रण आहे. 

पुस्तकाविषयी थोडक्यात :                 


                  या पुस्तकात लेखिकेने पुरुषाच्या जीवनातील वेगवेगळ्या पैलूंकडे अत्यंत संवेदनशीलतेने आणि वास्तवदर्शी दृष्टिकोनातून पाहिलं आहे. काही पुरुषांच्या कथा अनुभव, त्यांच्या मनात दडलेली पोकळी, गैरसमज समाजाकडून येणारा दबाव हे सगळं इथे समजून घेतलं आहे. हे पुस्तक वाचताना जाणवलं की, पुरुषही कधी कधी गोंधळतो, कोसळतो पण त्याला "पुरुष असून रडतोस"? असं विचारून थांबवलं जातं. त्यांच्या भावनांना मान्यता देणारा फारसा कोणी नसतो. 

समजूतदारांच्या सीमा ओलांडणारा प्रवास :

         


       "स्त्रीला समजून घ्यायचं तर खूप लिहिलं गेलंय, पण पुरुष समजून घेण्याचा प्रयत्न किती जणांनी केला असेल"?  ही ओळ वाचली आणि थांबून विचार केला. खरंच, समाजात पुरुष ही केवळ जबाबदाऱ्या पार पाडणारा, कधीही न थकणारा, भावनाविरहित पुरुष म्हणून पाहिला जातो. पण त्यांच्या आतल्या माणसाचं काय? त्यांच्या अश्रूंना, गोंधळाला, मूक वेदनांना कोणीच का समजत नाही? या प्रश्नाचे उत्तर शोधायचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणजे श्वेता हुनसनाले यांचं पुस्तक ' न उमजलेल्या पुरुष '

                          मी स्वतः हे पुस्तक वाचताना अनेक वेळा गोंधळले, विचारात पडले, घरातले बाबा, भाऊ, मित्र, शिक्षक- त्यांच्या वागणुकीकडे मी पुन्हा नव्या नजरेने पाहू लागले. आपण त्यांच्या खंबीरतेला नेहमी गृहीत धरतो. पण त्या ताकदीमागे असलेला थकवा, गोंधळ, आतल्या आत चालणारे संघर्ष कधीच पाहत नाही. एक प्रसंग आठवतो- पुस्तकात एक पुरुष  आपल्या आईच्या मृत्यूनंतर ही ऑफिसला जातो. कारण त्याला "कडवट नको" म्हणणारा समाज आहे. हाच समाज बाईला रडू देतो, पण पुरुषाला नाही. 

का वाचावं हे पुस्तक ? :

              ' न उमजलेला पुरुष ' हे पुस्तक केवळ पुरुषांच्या बाजूने बोलणं नाही, तर एक मोठा आरसा आहे- जो स्त्री आणि पुरुष दोघांनाही स्वतःकडे पाहायला लावतो. हे पुस्तक समजूतदारपणाची परिभाषा बदलत. आपल्या समाजात स्त्रिवादाचा उदात्त विचार झाला. आणि होणं गरजेचं होतं, पण त्याचवेळी माणूस म्हणून पुरुषांचाही एक वेगळा आवाज आहे हे स्वीकारणं तितकंच महत्त्वाचं आहे. 

समारोप :                             


             हे पुस्तक वाचताना एक प्रश्न मनात कायम राहिला. "पुरुष रडला तर कमी होतो का"? आणि उत्तर मिळालं- "नाही, तो माणूस होता! श्वेता हुनसनाले यांचं हे पुस्तक प्रत्येकाने वाचावं. अगदी तरुण वयातच कारण त्यांने केवळ पुरुषाबद्दलच नाही, तर मानवी भावनांबद्दलचं आपलं आकलन बदलतं. हा ब्लॉग मी लिहिताना केवळ लेखिकेच्या लेखन कौशल्याचं कौतुक केलं नाही, तर स्वतः मध्येही खूप काही नव्याने समजून घेतलं. तुम्ही हे पुस्तक वाचा, आणि एकदा का "न उमजलेला पुरुष" समजायला लागला, का जगाकडे पहायचा दृष्टिकोनच बदलून जाईल. शेवटी, हा ग्रंथ आपल्याला विचार करायला भाग पाडतो.खालील संदेश या पुस्तकातून  स्पष्टपणे मिळतो .

         " पुरुषही माणूस आहे

          त्यालाही समजून घ्यायला हवं

          त्यांच्या मौनात, त्यांच्या खांद्यावर

          आणि त्यांच्या डोळ्यांतही

          एक कथा आहे

          जी आपण कधी ऐकलेलीच नाही

         समजून घेतलं, की नातं घट्ट होतं 

          पण जर समजून न घेतलं 

           तर व्यक्ती कोलमडते!"  

    

   

                      कु. शुभांगी विजयकुमार बिरादार

                                बी.ए. तृतीय वर्ष /  शै.वर्ष  : २०२५-२६                                          


समन्वयक : डॉ.म.ई.तंगावार ९८९००६५६९०

सहसमन्वयक : प्रा.व्ही.जी. बिरादार, प्रा.जे.डी.संपाळे



Comments

  1. शुभांगी बिरादार यांनी अतिशय वस्तुनिष्ठपणे या ग्रंथाचे परीक्षण केले आहे. शुभांगीचे मनःपूर्वक अभिनंदन

    ReplyDelete
    Replies
    1. Dear Shubhangi, you are greatly appreciated for this insightful blog article 💐💐
      👍👍

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

ऐतिहासिक खरोसा लेण्या

रवी बापटले यांचे एड्स ग्रस्तांसाठीचे सेवालय

Lucky : A Special Member of Our Family