मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि युवकाची भूमिका
युवकाची भूमिका - कु.रेणुका जाधव
१५ ऑगस्ट १९४७ ला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले,परंतु काही संस्थाने हे भारतात समाविष्ट होण्यास तयार नव्हते.त्यातील एक संस्थान म्हणजे हैदराबाद .या संस्थानावर निजामाचे राज्य होते . मराठवाड्यातील काही भाग हा हैदराबाद यामध्ये समाविष्ट होता.परंतु हे संस्थान भारतामध्ये समाविष्ट होत नव्हते.निजाम हा हैदराबाद या संस्थानाला सोडण्यास तयार नव्हता. अनेकांनी वेगवेगळ्या चळवळीद्वारे निजामाचा पराभव करण्याचा प्रयत्न केला.निजाम मात्र ऐकतच नव्हता. तो हे संस्थान सोडून जात नव्हता.
मराठवाडा मुक्तीसंग्रामात अनेक स्त्रियांनी, युवकांनीही सहभाग घेतला होता .युवक हा कोणत्याही देशाचा प्रमुख आधारस्तंभ असतो. ज्या देशातील युवक हे जितके जागरूक असतात,त्या देशाचा विकास हा मोठ्या प्रमाणात व जलद गतीने होतो.
विशाल आमुची मायभुमी
मनात आमच्या नित्य वाहते
तारुण्याचे वारे
आजच्या युवकांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरातून जे काही चांगले मिळेल,ते घेण्याचा प्रयत्न करावा व आपल्यापासून दुसऱ्यांना आदर्श मिळेल असे बनण्याचा प्रयत्न करावा .पूर्वीचे युवक हे स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेऊन इतरांसाठी प्रेरणास्थान निर्माण करायचे.राजगुरू ,भगतसिंग, सुखदेव हेही तरुणचं होते,परंतु त्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली व ते देशासाठी एक आदर्श झाले.आजचे युवक हे राजकारणात सामील होत आहेत व गुन्हेगारीच्या मार्गावर जात आहेत.जर त्यांना लोकांसाठी एक आदर्श म्हणून कार्य करायचे असेल, तर सर्वप्रथम त्यांना या मार्गाचा त्याग करावा लागेल. युवकांना आपल्या देशासाठी कोणते कार्य करायचे असेल, तर सर्वप्रथम त्यांना 'देशाने आपल्यासाठी काय केले या गोष्टीचा विचार न करता आपण देशासाठी काय करू ' या गोष्टीचा विचार करायला पाहिजे.
आजचे युवक हे शिक्षित आहेत म्हणून ते कष्ट करण्यास नाकारतात . परंतु शिक्षा व कष्ट याचा कोणताही परस्पर संबंध नाही.म्हणून सर्वप्रथम आजच्या युवकाने मन व बुद्धी बरोबरचं मनगटलाही सक्षम करायला पाहिजे.कारण जोपर्यंत युवकाने आपल्या बौद्धिक ज्ञानाबरोबरच आपल्या शारीरिक ज्ञानाला महत्त्व देत नाहीत तोपर्यंत कोणत्याचं देशाचा विकास हा होऊच शकणार नाही.त्यामुळे युवकांनी फक्त नोकरीच्या पाठीमागे न लागता शेती या व्यवसायाकडेही लक्ष दिले पाहिजे.भारतातील प्रमुख व्यवसाय हा शेती आहे.त्यामुळे या व्यवसायाचा विकास झाला की भारताचा विकास होतो,परंतु आज शिक्षित युवक शेती करीत नाहीत.ते एक चांगली नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतात.
ज्या मातीत आपण जन्मलो त्या मातीला विसरता कामा नये.आजचे युवक हे नोकरीसाठी परदेशात स्थायिक होतात व आपल्या देशाला विसरून जातात.परदेशातील व्यक्ती हे उद्योगधंदे यासाठी भारतात येतात व आपल्या व्यवसाय भारतात चालवतात.परंतु आजचे आपले युवक हे नोकरीसाठी परदेशात जातात.त्यामुळे नवयुवकांनी शेती व उद्योगधंदे यांसारख्या व्यवसायाकडे लक्ष दिले पाहिजे.जर यांसारखे व्यवसाय हे आपल्या देशातचं आपण केलो तर आपल्या देशाचा विकास होईल .
पूर्वीच्या काळी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात एकता आढळून येत होती. तसेच मानवता ही पूर्वीच्याच काळी होती.कारण आजचा युवक हा मोबाईल , टीव्ही यांसारख्या उपकरणामुळे एकटा राहण्यास तयार होत आहे. त्यांना एकता ही माहितीच नाही.ते फक्त मोबाईलच्या जगात जगतात.परंतु त्या बाहेरही जग आहे हे त्यांना माहीतच नाही.म्हणूनच आजच्या युवकाला मोबाईल या उपकरणापासून दूर राहावे लागेल . जर याचा वापर कमी केला तरच ते देशासाठी काहीतरी करू शकतात. यासारख्या उपकरणामुळे तर लोकांची मानवताही नष्ट झाली आहे . पूर्वी जर काही झाले तर पूर्ण लोक ते पाहायला , त्यांची मदत करायला धावून यायचे.पण आज जर छोटासा अपघातही झाला तरी युवक आपल्या मनोरंजनासाठी त्याचा व्हिडिओ बनवून घेत आहेत. त्यांची मदत करायला आज कोणीचं तयार नाही. त्यामुळे आजच्या युवकाला मोबाईल या उपकरणाचा नाद सोडून आपल्या भविष्यात काय करायचे आहे? याचा विचार करायला पाहिजे.जर ते आपले धैय पूर्ण केले तरचं याचा फायदा देशाचा विकास साधण्यासाठी होतो.
आजच्या युवकांना राजकारण व कायदे याविषयी सामान्य जनतेला माहिती देऊन त्यांना या संबंधी साक्षर केले पाहिजे. जर व्यक्तीला आपल्या कायद्याची जाणीव असेल, तर तो कोणत्याही गुन्ह्याला आळा घालू शकतो. म्हणजेच लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे.आजचे सुशिक्षित युवक हे काही प्रमाणात अंधश्रद्धेच्या आहारी जात आहेत. परंतु त्यांना काय वाईट आणि काय चांगले हे काही प्रमाणात माहीत नसते. युवकांनी स्वतः या गोष्टीचा विचार केला पाहिजे. जर त्यांना या गोष्टी समजल्या तर ते अंधश्रद्धेच्या आहारी जाणार नाहीत. त्यामुळे आपल्या देशाचा विकास हा आपोआपचं होईल.
आजच्या सुशिक्षित युवकांनी आपल्या परिसरातील किमान २-४ व्यक्तींना तरी शिक्षित करावे. यामुळे निरक्षरतेचे प्रमाण कमी होईल व आपल्या देशाचा विकास होईल. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक सगळेच शिकलेले नव्हते, परंतु देशाविषयी त्यांच्या मनामध्ये अभिमान होता. तो अभिमान आज युवकांमध्ये फारसा दिसत नाही. हे दुर्दैव म्हणावे लागेल.काही यूवक पैसा जलद गतीने कमवावा यासाठी वाईट मार्गाचा वापर करतात, परंतु ते मार्ग योग्य नाहीत. विनाकष्ट पैसा मिळविण्यासाठी वाईट संगतीत जातात.परंतु समर्थ रामदास यांच्या म्हणण्याप्रमाणे,"कष्टाविना फळ नाही".जर गुलाब घ्यायचे असेल, तर काट्यातच हात घालावा लागतो. याप्रमाणे युवकांनी योग्य मार्गाचा वापर करून पैसा कमविण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आजच्या भारताचे युवक हे जागरूकही आहेत . कारण भारतात अनेक ठिकाणी युवामंडळे ही स्थापित आहेत. या मंडळाच्या माध्यमातून युवक हे आपल्या देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
मराठवाडा मुक्तीसंग्रामात अनेकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.परंतु आज या स्वातंत्र्य सेनानींच्या परिवारांकडे कोणी लक्ष देत नाहीत.फक्त एकाच दिवशी त्यांना बोलवून त्यांचा सत्कार केला जातो . नंतर त्यांच्याकडे कोणी लक्षही देत नाही. त्यामुळे आजच्या युवकांनी त्यांच्याबद्दल आदर भावना ठेवली पाहिजे व त्यांच्याकडून प्रेरणा घेतल्या पाहिजेत . त्यातून त्यांनी आपल्या देशाचा विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
( तालुकास्तरीय निबंध स्पर्धेतील दुसरे पारितोषिकप्राप्त निबंध. दोन हजार रुपये रोख रक्कम , प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.त्यावर आधारित हा ब्लॉग.)
नाव : कु.रेणुका राजकुमार जाधववर्ग : बी.कॉम.तृतीय वर्ष
२०२३-२४
समन्वयक : डॉ.म.ई.तंगावार,प्रा.व्ही.जी.बिरादार,प्रा.जे.डी.संपाळे





Comments
Post a Comment