द रियल हिरो : डॉ प्रकाश आमटे
७. द रियल हिरो : डॉ प्रकाश आमटे
- अभिषेक ऐनिले
डॉ. प्रकाश आमटे 'द रियल हिरो' हे पुस्तक किरण सोनार यांनी लिहिले आहे. लेखक किरण सोनार यांनी डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या शिक्षणाबद्दल, त्यांच्या स्वप्नाबद्दल इ. सविस्तर मांडले आहे. या पुस्तकात त्यांनी डॉ. प्रकाश आमटे यांच्याविषयी या पुस्तकात माहिती टप्प्याटप्प्याने मांडली आहे ती पुढील प्रमाणे आहे. १. हेमलकसातील माडिया गोंड २. हेमलकसाची उभारणी ३. आदिवासी यांच्याशी संवाद ४. शिक्षणातून प्रगतीकडे५. प्राण्यांचे नंदनवन ६. मंदाताईंची खंबीर साथ ७.आनंदाचे क्षण ८. पर्यटन आणि व्यवस्थापन ९. हेमलकसाचे उज्वल भविष्य
मी जेव्हा पुस्तक वाचण्यास सुरुवात केली तेव्हा हेमलकसा हे ठिकाण काय आहे हे खऱ्या अर्थाने मला समजले. कारण मी हे पुस्तक वाचण्यापूर्वी हेमलकसा हे ठिकाण काय आहे हे मला माहीत नव्हते. ते मला आमच्या मराठी विषयाचे प्राध्यापक डॉ. म. ई. तंगावार सर यांच्याकडून समजले. कारण 'आमची आई : साधनाताई' हा पाठ आमच्या अभ्यासक्रमामध्ये होता. साधनाताई या डॉ. प्रकाश आमटे यांच्या आई. आणि पाठाचे लेखिका प्रकाश आमटे यांच्या धर्मपत्नी मंदाताई प्रकाश आमटे हे आहेत. हा पाठ शिकत असताना डॉ. प्रकाश आमटे हे कोण आहेत हे मला खऱ्या अर्थाने समजले. म्हणून पाठ शिकून मला डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्या जीवनाबद्दल पुस्तक वाचण्याची स्फूर्ती मनात निर्माण झाली. मी आमच्या मराठीच्या शिक्षकांशी संपर्क करून मला त्यांच्या जीवनाबद्दल अर्थात त्यांची पुस्तके वाचण्याची इच्छा मी आमच्या शिक्षकांकडे केलो. तेव्हा डॉ. म. ई. तंगावार सर डॉ. बाबा आमटे 'द रियल हिरो' हे पुस्तक मला उपलब्ध करून दिले.
हेमलकसा या ठिकाणी डॉ. प्रकाश आमटे हे सध्या निवास करतात. आदिवासी लोक जे आहेत किंवा डॉ. प्रकाश आमटे आदिवासी लोकांची जी सेवा केली ते ठिकाण म्हणजेच हेमलकसा होय.नागपूर शहर ते हेमलकसा हे अंतर जवळपास ३५० किलोमीटर आहे. परंतु नागपूर ते हेमलकसा असा थेट प्रवास करता येत नाही. प्रथम आपण नागपूर शहर ते चंद्रपूर हा प्रवास करणे आवश्यक आहे. हे अंतर १५० किलोमीटर आहे. त्यानंतर चंद्रपूर ते बल्लारपूर हे अंतर पार केले पाहिजे. हे अंतर आहे २० किलोमीटर नंतर बल्लारपूर ते आलापल्ली हा प्रवास करावा लागेल. हे अंतर १२० किलोमीटर आहे. त्यानंतर आल्लापल्ली ते लोकबिरादरी प्रकल्प आर्थात हेमालकसा हा प्रवास करावा लागेल. अशाप्रकारे प्रथम नागपूर शहर या ठिकाणी जावे लागते.
हे पुस्तक वाचल्यानंतर मला असे समजून आले की, आजच्या युगात सुद्धा पैसे कमवणे हा उद्देश डोळ्यासमोर न ठेवता आपण समाजसेवा केली पाहिजे असे विचार करणारे डॉक्टर्स सुद्धा या जगात आहेत. डॉ. प्रकाश आमटे यांच्याबरोबरच त्यांच्या धर्मपत्नी सौ. डॉ. मंदाताई प्रकाश आमटे यांनी सुद्धा प्रकाश आमटे यांच्याबरोबरच हेमलकसा या ठिकाणी समाजसेवा करीत आहेत. आजच्या युगात पती-पत्नी जर डॉक्टर्स असतील तर आपण कशाप्रकारे पैसा कमावला पाहिजे हा विचार करतात. परंतु फार दुर्मिळ ठिकाणी असे दिसून येते की, पती-पत्नी डॉक्टर्स आहेत आणि ते समाजाची सेवा करतात.
आदिवासी लोकांसाठी डॉ. प्रकाश आमटे यांनी आपले स्वतःचे जीवन समर्पण केले आहे. इतकं काम करूनही करूनही ते काय म्हणतात हे लेखकाने पुस्तकाच्या मलपृष्ठावर डॉ.प्रकाश आमटे यांचे वाक्य लिहिले आहेत ते असे की, " आमचं अजून खूप काम करायचं बाकी आहे. आदिवासी आता स्वतंत्र होतोय; पण त्याला बाहेरून येऊन कोणी मदत करण्याची गरज भासणार नाही इतका तो स्वयंपूर्ण व्हावा अशी इच्छा आहे. त्याला वाटेवर आणून सोडायचं काम आम्ही केलंय. पुढची वाटचाल जेव्हा तो निर्भयपणे, आत्मविश्वासाने स्वतःच्या बळावर करेल तेव्हाच इथलं काम पूर्ण होईल." डॉ. प्रकाश आमटे आदिवासी लोकांच्या शरीराची डॉक्टर म्हणून काळजी घेतातच परंतु त्यांच्या राहण्याचा, त्यांच्या खाण्याचा आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी सुद्धा घेत आहेत.
माझी एक वाचकांना विनंती आहे की, पडद्यावरील नायक अर्थात हिरो - हिरोईन यांच्यामध्ये असलेल्या कलागुनामुळे आपण त्यांना हिरो असे संबोधतो. मी असे म्हणेल हिरो ते नाहीत, तर खऱ्या अर्थाने हिरो डॉ. प्रकाश बाबा आमटे यासारखे समाजसेवक आहेत.एक डॉक्टर सेवा करतो अर्थात समाजाची आणि हेमलकसा या ठिकाणी आदिवासी लोकांसोबत निवासस्थानी राहतो.अशा माणसाला मी हिरोची उपमा देईन. मी वाचकांना एक संदेश देईन की 'द रियल हिरो' प्रकाश आमटे हे पुस्तक एक वेळेस तरी प्रत्येकाने वाचले पाहिजे.
नाव : अभिषेक गंगाधर ऐनिले
वर्ग: बी.कॉम.प्रथम २०२३-२४
ब्लॉग समन्वयक : डॉ.म.ई.तंगावार, प्रा.व्ही.जी.बिरादार, प्रा.जे.डी.संपाळे


.jpeg)

Comments
Post a Comment