UPSC संदर्भात माझा अनुभव

५ . UPSC संदर्भात माझा अनुभव

                      -  कु.नितीशा संजय जगताप   

शब्दांकन : कु.वैष्णवी योगेश कोटलवार

              
        महाविद्यालयाच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षेची निगडित ध्यास यशाचा या उपक्रमांतर्गत ऑनलाईन स्वरुपात माझं व्याख्यान ऐकायला आपण उपस्थित आहात.आणि माझा इतका चांगला परिचय करून दिल्याबाबत मॅडमचे खूप खूप धन्यवाद! मी अत्ता आसाममध्ये आहे.कारण मला आसाममध्ये कॅडर  मिळालेल आहे.आत्ता मी ट्रेनिंगला पण आसाममध्येच आली आहे. माझी आईपीएसची फर्स्ट फेजची ट्रैनिंग  संपलीय.आता डिस्ट्रिक प्रॅप्क्टिकल ट्रेनिंग सुरु झालीय. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून आणि ७ महीने सप्टेम्बर होइपर्यंत इथेच डिस्ट्रिक प्रॅक्टिकल ट्रेनिंगला मी आहे.

    पहिली गोष्ट तर माझ्या शैक्षणिक पार्श्वभूमी बाबतीत तुम्ही सगळ्यान्नी ऐकलच असेल की, माझ सगळ शिक्षण पहिलीपासून पुण्यात झालं. मी १२ वी पर्यंत सायन्सची विद्यार्थीनी होते.नंतर बी.ए.ची डीग्री घेतली. स्पर्धा परीक्षेला डोळ्यासमोर ठेवूनच आर्ट्सची डीग्री सायकॉलॉजी मध्ये फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथून घेतली. UPSC द्यायचा निर्णय कधी झाला, या प्रश्नाच उत्तर द्यायच झाल तर १२ वी नंतर मी ठरवल होते की मला या परिक्षेची तयारी करायची आहे. मला हे बघायच होत की मला हे करता येईल की नाही. कारण या परिक्षेबाबतीत खूप  काही गोष्टी ऐकल्या होत्या,खूप काही गोष्टी वाचल्या होत्या. की ही परीक्षा खूप मोठी आहे,आणि खूप प्रयत्नानंतर लोक यशस्वी होतात.त्यावेळी मी  वाचायला सुरु केल होत. 

          UPSC संदर्भात पुण्यात यूनिक अकॅडमीत अनेक विद्यार्थी तयारी करीत होते. मग मी तिथे पण  एक लेक्चर अरेंज केल होत. माझ्या जडणघडणीत युनिकचे संचालक तुकाराम जाधव यांचा देखील वाटा महत्पूर्ण  आहे. मला वाटल की माझी जी पार्श्वभूमि आहे, माझे आई- वडील असतील किंवा  त्यांची जी शैक्षणिक पार्श्वभूमि असेल. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की मला एवढे आर्थिक मदत करणारे  व सतत प्रेरणा व स्वातंत्र्य देणारे आई-वडील मिळाले. ज्यांनी माझ्या शिक्षणासाठी मला पुण्यासारख्या मोठ्या शहरात पाठवल. म्हणून मी स्वत:ला  भाग्यशाली मानते. पण मी ज्यावेळी अन्सार शेख सरांची स्टोरी ऐकली. त्यावेळीच मला अस वाटल की, जर एक विद्यार्थी  आर्थिक पार्श्वभूमि नसताना पण शिकतो, मला वाटतय ते त्यांच्या परिवाराध्ये पाहिले ग्रॅज्यूएट होते. एवढी अवघड परिस्थिति मी स्वतःला चॅलेंज करुण सरांचा,मित्रांचा वगैरे सपोर्ट घेऊन ते एवढ्या कमी वेळात जर UPSC सारखी परीक्षा क्रेक करू शकतात. जर ते स्वतःला म्हणत असतील की नाही, तुम्ही अस एकदम खचून जाल. अस नाहीये की महाराष्ट्रातील लोक ही परीक्षा क्रेक करू शकत नाहीत किंवा  ही परीक्षा क्रेक करायला मोठ काहीतरी लागत किंवा  तुम्ही खुप हुशार असले पाहिजेत. डीग्री  मोठी असायला पाहिजे. ते त्यांनी त्यावेळी अस सांगितल होते  की, अशी काहीही गरज नसते. मग मला वाटल की ते क्रेक करू शकतात आणि त्यांना तेवढ्या प्रयत्नानंतर यश मिळून ते तेवढ्या मोठ्या पदापर्यन्त पोहोचू शकतात  मग आपणही पण प्रयत्न कराव.

           मी बी.ए.साठी सायकॉलॉजी हा विषय निवडला असला तरी प्रथम वर्षापासूनच अभ्यासाचे प्लॅनिंग करायचे ठरविले होते पण ते पूर्णपणे जमलं नाही.UPSC बाबतीत बोलतीय आत्ता. मग मी वाचयला सूरू केली. गेली 2 वर्ष मी तेवढ्या प्लॅनिंगनी अभ्यास केला नव्हता. कारण जस्ट कॉलेज मध्ये आले होते. तेवढ्या गांभीऱ्यतेने मी पहिले 2 वर्ष अभ्यास केले नव्हते. नंतर मी द्वितीय वर्षाच्या शेवटी शेवटी वेळापत्रक आखून जो एक व्यवस्थित अभ्यास असतो,प्लॅन स्टडी जे म्हणतात तो मी सुरु केला.आणि थर्ड ईयर मी व्यवस्थित अभ्यास केला.आत्तापर्यंत माझी फ़क्त बी.ए.डीग्री  सायकॉलॉजीमध्ये आहे.

            12 नंतर मी माझ्या आई - वडिलांना सांगितल की, मला सायन्स  जमत नाहीये किंवा मला इंजिनियरिंग नाही करायची. त्यावेळी त्यांनी मला प्रचंड सपोर्ट केला. सायन्समध्ये मी जे.डबल ई. वगैरे दिल होत पण मला त्यात विशेष यश मिळाल नाही. कारण पहिली गोष्ट - आवड तर नव्हतीच आणि दूसरी गोष्ट  मी अभ्यासही केला नव्हता. मग मी हे समजावल माझ्या आई - वडिलांना की मला यात काहीही इंट्रेस्ट नाही. मग ज्याप्रकारे त्यांनी मला सपोर्ट केल. मला  छान वाटल आणि त्यांच नेहमी हेच म्हणण होत की, जे क्षेत्र तू निवेडत आहेस ते निवड. त्याला आमचा विरोध नसणार. पण ज्या क्षेत्रात तुला जायचय तिथे तुला एकदम बेस्ट करायचय. नाही झाली तरीही तू प्रयत्न करत रहा. आणि जे लक्ष्य,ध्येय आहे ते एकदम उच्च स्तराचा ठेवला पाहिजे. हे आधीपासूनच आईने शिकवल होत.

       मला वाटतय की, ह्या क्षेत्रात मी आले तर मी त्या क्षेत्रात चांगल्या लेवल पर्यंतच पोहोचण्याचा मला आत्मविश्वास होता. आणि मी त्यांना म्हटले की, माझा प्रयत्न मी कधी कमी पडू देणार नाही आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आणि आई वडील दोघांणीही मला सपोर्ट केला हे एक फायनॅन्शियल सपोर्ट आहे आणि इमोशनल सपोर्ट पण आहे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी माझ्या फॅमिलीनी मला पूर्ण सपोर्ट केला म्हणून माझी फॅमिली हीच माझी सगळ्यात मोठी इंस्पिरेशन आहे. आणि त्यांचा सपोर्ट नसला असता,तर मला नाही वाटत की माझी निवड झाली असती.किंवा मला या परिक्षेत यश मिळाल असत.

              तयारी बाबतीत बोलायच झाल तर मी द्वितीय वर्षाच्या चौथ्या सेमिस्टर पासून  वेळापत्रक आख़ला होता. तोपर्यंत मला एक आईडिया आली होती की, किती टॉपिक्स आहेत किंवा  किती विषय आहेत, कस प्लॅन केल,कस आपण मंथली डिवाइड केल याची मी एक टाइमटेबल पद्धतित आखुन ठेवली होती. त्यासाठी जे यूनिक अकॅड़मीचे तुकाराम पाटील सर आहेत त्यांनी मला वेळोवेळी खूप मदत केली आणि मला ज्या छोटे मोठे डाउट असायचे पूस्तकासंदर्भात,अभ्यासक्रमासंदर्भात ते मी त्यांना वेळोवेळी जाऊन विचारायचे.मी एकदम प्रामाणिकपणे सांगायचे की यात मला डाउट आहे. कारण या छोट्या छोट्या डाउटमुळे एक फार मोठ कन्फ्यूजन तयार होते म्हणून मी त्यांना विचारायचे. अशा प्रकारे मी वेळापत्रकानुसार अभ्यास करायचे. नंतर मी तुकाराम  सरांच्या गाइडन्सनी पुढे पुढे जात गेले.आपल्याला एखाद्या वेळी अस वाटत की आपण बरोबर आहोत की नाही किंवा काही चुक झाली का? अशा परिस्थितित गाइडन्स घ्यायला हरकत नाही. म्हणूनच मी कॉलेज आणि UPSC  करू शकले.जस की मी सांगितल,मी फर्स्ट ईयरला एक वर्षासाठी UPSC च्या फाउंडेशनला गॅप केला होता आणि मग चौथ्या सेमिस्टर पासून मी सिरियसली प्रिपेयर केल.मग मला लोक बऱ्याचदा विचारतात की,हे कस  केल तुम्ही? कॉलेज आणि UPSCच  प्रिपरेशन एकत्र. तुम्हाला अवघड गेल नाही का ? इत्यादी ...

         माझ कॉलेज आठ वाजता सुरु व्हायच. त्याच्या आधी मी ठरवल होत की दररोज सर्वप्रथम वर्तमानपत्र वाचायच. कारण ही परीक्षा लवकरात लवकर क्रॅक करायची असेल,तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात. कॉलेजमध्ये अनेक कार्यक्रम, स्पर्धा व्हायच्या त्यात मला आवडही होती पण मी ठरवल की आत्ता या गोष्टी महत्वाच्या नाहीत. कॉलेजच्या काही गोष्टी मी निवडल्या होत्या, उदाहरणार्थ मी एका स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात मला वाटल की जर MPSC किंवा  UPSC क्लियर होत नसेल तर स्टेज वर जाऊन बोलण असेल किंवा एक व्याख्यान असेल हे कुठेही कामाला येत. तेंव्हा ती एक महत्वाची लाइफ स्किलस  असल्यासारखी आहे.मग ते असण आवश्यक आहे म्हणून मी या स्पर्धेत भाग घेतला होता. पण ते सोडून अगदी कॉलेज संपल्या संपल्या मी घरी यायचे आणि अभ्यासाला लागायचे.ज्यावेळी कॉलेजच्या परीक्षा जवळ यायच्या त्याच्या एक दोन आठवड्या आधी मी कॉलेजचा अभ्यास करायचे. मी एक काम करायचे,जो कॉलेजचा अभ्यासक्रम आहे आणि UPSC चा अभ्यासक्रम आहे यात किती गोष्टी महत्वाच्या आहेत.कॉलेजच्या कोणत्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर मला ते UPSC ला फायदेशीर ठरणार आहे. या गोष्टीचा अभ्यास केला. माझा विषय सायकॉलॉजी होता. पण जनरल मध्ये माझे दोन विषय होते.सायकॉलॉजी व पॉलीटीक हे दोन्हीही फार महत्वाचे विषय आहेत UPSC साठी. जे त्याचे थेरिज वगैरे असतील जास्त खोल मध्ये न जाता अशा थेरीसाठी मी एक वहीच तयार केली होती. ज्या थेरी मला इंट्रेस्टिंग वाटतात त्या मी लिहून काढत होते. जनरल स्टडीचा एक पेपर असतो. या माध्यमातून त्याची पण तयारी सुरू केली.अशा काही गोष्टी मी केल्या त्यामुळे मला कॉलेज आणि UPSC नियोजन करायला अवघड गेल नाही.

         UPSC परिक्षेबाबतीत बोलायच झाल तर तीन सेन्स असतात.1) प्रिलिंयम्स 2) मेन्स  3) इंटरव्यू. प्रिलिंयम्सस मध्ये दोन पेपर असतात. एक जनरल स्टडीचा असतो आणि एक सि-सॅटचा असतो. दोन्हीही बहुपर्यायी प्रकारच्या प्रश्नाचे पेपर असतात.त्यात दोन्ही पेपर मध्ये नेगेटिव्ह मार्किंग असते. सी-सॅट मध्ये आपले जे इंग्लिशचे उतारे  असतील किंवा बेसिक गणिताशी सम्बंधित किंवा अँटिट्यूडला  सम्बंधित प्रश्न असतील ते असतात. मेन्स मध्ये आधी एक एस्सेचा पेपर असतो. त्याच्या नंतर जनरल स्टडीचे चार पेपर असतात. जनरल स्टडी (G. S.) असा शॉर्ट फॉम असतो. G.S. 1,2,3 आणि 4 आणि त्यानंतर आपल्याला एक ऑप्शनल निवडायचा असतो. माझा ग्रॅज्यूएशनचा जो विषय होता सायकॉलॉजी. यालाच मी ऑप्शनलची निवड केली होती. या ऑप्शनलचे दोन पेपर असतात ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2 माझ सायकॉलॉजी 1 आणि सायकॉलॉजी  2 अस ऑप्शनल होत.एक भाषेचा कॉलीफ़ाईग  पेपर असतो,मिनिमम मार्क्स पाहिजे असतात ते कंन्सिडर नाही करत. आपण पण ते मिनिमम मार्क्स भाषेच्या पेपरमध्ये नाही मिळाले तर तुमचा रँक  पण नाही येत. म्हणजे ते बरोबरीने महत्वाच असत.ही झाली मेन्स.

      आता तिसरी स्टेप म्हणजे इंटरव्यूची असते. जिची सगळ्यांनाच उत्सुकता असते. कारण आपण सोशल मिडियावर बरेच इंटरव्यू वगैरे बघतो, जे क्लासेस वगैरे घेतात आणि व्हाट्सऍवर पण बरेच काही काही मैसेजेस असतात.हा एक प्रश्न UPSC च्या परिक्षेत विचारला होता. प्रिलिंयम्सस ही पायरी असते. यानेच कळत की तुम्ही परीक्षा देऊ शकता की नाही, मेन्सने कळत की तुम्ही लिस्ट मध्ये असता की नाही. आणि इंटरमिजेट चा अर्थ की तुम्ही लिस्ट मध्ये आहात, कुठे आहात. मग या तिन्ही स्टेप्स  बरोबरीने महत्वाच्या असतात. हे झाल परिक्षेसंदर्भात.

          मला नेहमी अनेकजण  विचारतात की आपण भाषा जी निवडतो त्यासंदर्भात. लिहिण्यासाठी जस की मी सगळे पेपर इंग्रजी भाषेतच लिहिली होती. तर असही लोक विचारतात की मी मराठीमध्ये कम्फरटेबल आहे तर मराठीमध्ये लिहिली तर चालेल का? किंवा त्या गोष्टीचे काही वाईट इम्प्रेशन पडेल का? तर मी म्हणेन की अस काही नाहीये. तुम्ही मराठीमध्ये लिहिलात तर तुमच नुकसान होईल अस काही नाहीये. म्हणून त्या गोष्टीची तुम्ही अजिबात काळजी करू नका. कारण भाषा ही तुम्हाला निवडायची आहे. तुम्हाला जे सोप जाईल किंवा तुम्ही तुमचे विचार कुठल्या भाषेत चांगले मांडू शकता त्याच भाषेची तुम्ही निवड करा. त्यात काहीही नुकसान नसत. आणि मला लोक संसाधने बाबतीत पण विचारतात की ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासेसच कस असत किंव्हा ऑफलाईन केल्यानंतर क्लियर व्हायची जास्त चांसेस असतात का ? तर मी म्हणेन की अस अजिबात नाहीये. बरेच लोक माझ्या बॅचमध्ये आहेत, मला असे बरेच लोक माहिती आहेत ज्यानी ऑनलाईन करूनही परीक्षा क्लियर केली आहेत. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही ऑफलाईन क्लासेस वर जास्ती कम्फरटेबल असाल तर तुम्ही ऑफलाईन क्लासेस मध्ये पण जाऊ शकता.

             एक पहिली गोष्ट जी रियलाइझ करायची की प्रत्येक विषयासाठी तुम्हाला तुमची संसाधने खूप मर्यादित ठेवायची आहेत.मार्केट मध्ये प्रत्येक वर्षी खूप नवीन पुस्तके आलेली असतात. ती सगळी विकत घेतल्यास गोंधळ होईल.म्हणून माझ अस म्हणन आहे की, तुम्ही प्रत्येक विषयाची दर्जेदार पुस्तकाची एक यादी तयार करा आणि त्याचा अभ्यास करा. लोक विचारतात की, मार्क कसे कसे देतात ? परिक्षेची पूर्ण प्रोसीजर  कशी असते ? तर हे सगळ तुम्ही गूगल वर जरी सर्च केलात तरी तुम्हाला याची माहिती मिळून जाईल. त्यामधील एका Pdf मध्ये तुम्हाला सर्वच माहिती मिळून जाईल. म्हणून मी अस म्हनेन की ते तुम्ही एकदा नक्की वाचा. 

            मे 2020 मध्ये माझा पहिला अटेम्ट होता.परंतु त्याचवर्षी कोविड झाल्यामुळे तो लांबत गेला. अशा वाईट परिस्थितित पण मी ठरवल होत की काही झाल तरी आपण आपला अभ्यास थाबंवायचा नाही. म्हणून मी अभ्यास करत गेले. आणि नंतर ऑक्टोबर तारीख निघाली. नंतर प्रिलिंयम्स सोडून. तुम्हाला अस वाटत की, आपण फ़क्त ऑप्शनलचाच किंवा  मेन्सचाच अभ्यास करू पण अस अजिबात करू नका. कारण फ़क्त प्रिलिंयम्सची तयारी करण अत्यंत महत्वाच आहे. आणि त्यासाठी जी  प्रश्न असतात, माझ्या परिक्षेत जे विचारलेले प्रश्न आहेत त्याचा एक अभ्यास असन किंवा त्याची एक आयडिया असन हे अत्यंत महत्वाच असत. जे परिक्षेमध्ये आपल्याला मदतीला येतात. तर मेन्ससाठी पण एक चांगली आयडिया असन महत्वाच आहे. पाच महीने तर पूर्ण प्रिलिंयम्सची तयारी केली होती. मग ऑप्शनल विषय हातात घेतला आणि नंतर जेंव्हा मला कळल की परीक्षा ऑक्टोबारमध्ये आहेत. तेंव्हा मी मेन्सची तयारी केली पण सराव पेपर मध्ये मला जे काही मार्क्स पडले,मला लक्षात आल की कुठल्या पेपर मध्ये माझी  चूक होत आहे.अस एक व्यवस्थित फोकस करुण मी पुन्हा अभ्यास करत राहिले.एकदा प्रिलिंयम्स  झाली की आपल्याला लक्षात येत की आपण सेफ झोन मध्ये आहोत का नाही ? तरीही मला एक भीति बसली होती की होणार की नाही ? पण मी ठरवल की ठीक आहे, हे सगळ होत राहिल. मी प्रामाणिकपणे जेवढ आपल्याला जमेल तेवढ प्रयत्न केले.

        जनरल आणि ऑप्शनलच्या प्रत्येक पेपर साठी रायटिंग प्रैक्टिस असन खूप महत्वाच असत. कारण जेंव्हा मी सुरुवात केली होती त्यावेळी 13 प्रश्न व्हायचे 20 पैकी. पण स्पर्धेत टीकून राहायच. तुम्हाला 20 चे 20 प्रश्न  करावेच लागतील. म्हणून माझ अस ठरल होत की पेपरच्या दिवशी भूकंप जरी झालं  तब्येत जरी ख़राब असली तरीही ते 20 प्रश्न मी पूर्ण करणार,कारण तुम्ही एकही प्रश्न सोडलात तर तुम्ही स्पर्धेच्या बाहेर निघून जाता. कारण एवढी जास्त स्पर्धा आणि एवढे जास्त लोक आहेत की तुम्ही एकही प्रश्न सोडू शकत नाही आणि कॉलेजमध्ये आपल्याला अस वाटत की, आपण प्रत्येक प्रश्नाच एकदम सुंदर उत्तर लिहूया, एकदम डिटेल सहित,जेही अभ्यास केलाय तो आपल्या पेपर मध्ये दिसल पाहिजे.एग्झाम Quality ही आपल्यामध्ये सराव करुनच येईल.मग जे रायटिंग प्रैक्टिस मी म्हणत होते ते खूपच महत्वाच आहे आणि मी सराव केला.सुरुवातीला माझे 3 , 3 प्रश्न पूर्ण व्हायचे पण फाइनली माझे 20 च्या 20 प्रश्न पूर्ण झाले. जनरल स्टडी आणि ऑप्शनल मध्ये माझा कुठलाही प्रश्न सुटला नाही. ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि तुम्हाला वाटत असेल की, ही  मोठी अचीव्हमेंट आहे, पण प्रत्येक विद्यार्थी मेन्स अटेंड करतो आणि मला खरच अस वाटत होत की होईल का नाही ? पण मला या एक्झामसाठी जस की मी सांगितल गाइडन्स मिळाल होत. की जे  महत्वाच असत. मग ते म्हणत होते की तू कसे प्रश्नांचे उत्तर लिहिले आणि तुझी लिहिण्याची पद्धत कशी आहे हे आम्हाला माहिती आहे.म्हणून कारण एक मेंटल स्टेट असते परीक्षा द्यायची. कधीकधी अस होत की इतके प्रश्न लिहिलेत तुम्ही की तुम्हाला आठवतच नाही की तुम्ही काय लिहिलात? म्हणून आपल्याला अस वाटत की होणार की नाही ? याच जजमेंट करण पण खूप अवघड असत. पण ते मला धीर देत राहिले. आणि म्हनाले की तू पुढच्या तयारीला लाग आणि मग झाल. 

         इंटरव्यूसाठी पण माझी निवड झाली होती. मी मेन्स आणि प्रिलिंससाठी द हिन्दू व  इंडियन एक्सप्रेस ही वर्तमानपत्र रोज वाचायची.  हॉबीज मध्ये रायटिंग लिहिल होत. आणि छोट्या छोट्या गोष्टी पॉइंट करुन  कस विचारतात. उदाहरणार्थ माझ जन्मस्थान लातूर आहे. लातूरमध्ये काय काय आहे ? कोणकोणत्या घटना घड़ल्या ? अस विचारतात. अशा छोट्या छोट्या गोष्टीच मी एक शॉर्ट नोटस  तयार केल होत.ते मला जास्ती महत्वाच ठरल. कारण ते एकदम पॉइंट माझ्या डोक्यात आले, तो प्रश्न त्यांनी मांडल्या मांडल्या आणि त्यामुळ मला  सोप गेल. तर हा माझा 20 , 25 मिनिटांचा इंटरव्यू. एक चेअरमॅन होते. पाच लोक असतात. त्यातला एक चेअरमॅन असतो आणि ते 5 लोक तुम्हाला प्रश्न विचारतात. 20 मिनिटांचा इंटरव्यू असतो आणि खूप फ्रेंडली बोलण होत. तर माझा इंटरव्यू व्यवस्थित गेला.डीसेंबर 2021 मध्ये 3 वर्ष फाउंडेशन कोर्स केला आणि मग मार्च लास्ट विकमध्ये 2022 ला सरदार वल्लभाई पटेल नॅशनल पोलिस अकॅडमी हैदराबादमध्ये प्रशिक्षण सुरु केल आणि अत्ता मी डिस्ट्रिक प्रैक्टिकल ट्रेनिंगला. बहुतेक आसामध्ये डीसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीला माझी पहिली पोस्टिंग सुरु होईल. मी माझे व्याख्यान इथेच थांबवते. धन्यवाद !

( महाविद्यालयातील व्यवसाय मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा समितीच्या वतीने दि.२४/०३/२०२३ रोजी देशातील सर्वात तरुण यूपीएससी उत्तीर्ण महिला अधिकारी कु.नितीशा संजय जगताप यांच्या ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील व्याख्यानाचे शब्दांकन महाविद्यालयातील कु. वैष्णवी कोटलवार यांनी खूप मेहनत घेऊन केले आहे. आज शब्दांकनातही रोजगार दडलेला आहे.आपण हा लेख वाचून ब्लॉगच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रतिक्रिया द्याल.ही अपेक्षा! )

शब्दांकन : कु.वैष्णवी योगेश कोटलवार

               (बी.ए.प्रथम वर्ष - २०२२-२३ )

ब्लॉग समन्वयक : डॉ.म.ई.तंगावार, प्रा.व्ही.जी.बिरादार, प्रा.जे.डी.संपाळे

Comments

  1. प्रेरणादायी व्याख्यानाचे खूप छान शब्दांकन. वैष्णवीचे हार्दिक अभिनंदन!

    ReplyDelete
  2. छान शब्दांकन....
    वैष्णवी अभिनंदन व मार्गदर्शक प्राध्यापक टीमचे ही हार्दिक अभिनंदन

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ऐतिहासिक खरोसा लेण्या

रवी बापटले यांचे एड्स ग्रस्तांसाठीचे सेवालय

Lucky : A Special Member of Our Family