माझ्या आईचा कवितासंग्रह
४. माझ्या आईचा कवितासंग्रह - विशाखा देशपांडे
आज मी शब्द वैभव या
पुस्तकाबद्दल लिहीत आहे. या कवितासंग्रहाची कवयित्री इंदुताई देशपांडे या
आहेत. त्यांनी आरोग्य सेविकेची नोकरी करत असताना लेखन पण केले आहे. त्यांचा जन्म १९६२ मध्ये झाला. मृत्यू २७ एप्रिल २०२१ मध्ये झाला. त्यांचा जन्म नांदेड जिल्ह्यामध्ये
नायगाव येथे झाला आहे. त्यांच्या जीवनात अनेक उतार चढाव आले व ते अनुभव त्यांनी आपल्या कवितेमध्ये व्यक्त केले आहे.
माझ्या आईच्या कविता मुक्तछंदामध्ये आहेत.त्यांनी विविध विषयावर कविता लिहिल्या. तसेच त्यांनी कवितेबरोबर विणकाम ,पेंटिंग, भरतकाम ,समाजसेवा हे छंद सुद्धा जोपासले आहेत.त्यांच्या कविता लोकमत व गोदातीर, एकमत इत्यादी पेपर मधून छापून आले आहेत .कवयित्री या समाज माध्यमे म्हणजेच प्रसार माध्यमापासून जरा दूरच होत्या. त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी ३५ वे मराठवाडा साहित्य संमेलन नायगाव येथे कविता वाचन केले आहे.
शब्द वैभव याचा अर्थ शब्दांचे वैभव असा आहे. शब्दाचे वैभव वैभवशाली आहे. मग पृष्ठावर असलेले चित्र त्याचा अर्थ की कमळाप्रमाणे ताजी सुगंधीत असावी कळी प्रमाणे ज्ञान घेऊन फुलायचे आहे, कॅम्पुटर म्हणजेच विज्ञान आहे. या पुस्तकात विविध कविता आहेत.आत्ता पण या युगासाठी उपयुक्त आहेत .या जमान्यात पण लिंगभेद आहे तो न मानावा असे ते आपल्या कवितेमधून सांगतात. या पुस्तकाला शुभेच्छा लक्ष्मीकांत तांबोळी या लेखकांचे लाभलेले आहे.कवयित्री यांनी विविध विषयावर लेखन केले आहे त्यांच्या कविता कुटुंब नियोजन, स्वच्छता ,एड्स, महिलांच्या आरोग्य ,लिंगभेद यावर आहेत .कविता करणे त्यांचा छंद होता. या छंदातून त्यांनी आपल्या भावना विचार व सामाजिक समस्या मांडले आहेत. त्यांची कविता संग्रहाची सुरुवात नवीन वर्षाचे सकाळ या कवितेतून होते.
मराठी पित्याचा जरतारी फेटा संसार जरी फाटका मनाने आहे मोठा
मराठी माणसात संस्कारांचे
भरले ताट दारी जरी आल्या शत्रू नाही फिरवीत पाठ
चालले बोलणे करारी
उभ्यासभेत मानतात करूनी कष्ट ओढती राहट
घेऊन घटकावर पहाट निद्रा
जुंपली बैल पोटाची पहाट जोडूनिया नाते चिखल पाण्याची गाठ
जरी आली भरून गंगा
असता काठोकाठ आली तरुण गंगा असता भरून
काठोकाठ
हाती निशान तिरंगा आले
चढवून वरती घाट अवघे दुमदुमले मराठवाडा महाराष्ट्राचे तट
या कवितेत मराठी माणूस मुख्आय हे. मराठी माणसावर
ही कविता लिहिली आहे.मराठी माणूस हा पैशाने जरी श्रीमंत नसला, तरी मनाने श्रीमंत
आहे. मराठी माणसांचे संस्कार हे दारी शस्त्र जरी आले तरी तो त्याला जेवल्याशिवाय
जाऊ देत नाही. तो ताट मानेने जगतो. चालणं बोलणं हे करारी आहे. कष्ट करून जगतो. झोप न घेता काम करतो. सकाळी पहाट झाली की बैलांची जोडी घेऊन शेतावर जातो. काम
करण्यासाठी पहिल्यांदा तो आपल्या मुलासारखा जपतो, ज्याप्रमाणे गंगा भरून वाहत
असली तरी पोहून जातो त्याप्रमाणे मराठी माणूस प्रत्येक संकटात तरून जातो. अनेकजण महाराष्ट्रासाठी लढले आहेत.अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून ते
आत्तापर्यंत मराठी बटालियन या नावाने सैनिक लढतात. मराठवाडा व महाराष्ट्र माणूस संघर्ष करणारा व झगडणारा आहे. माझ्या आईच्या कवितेचा जन्म निरीक्षण व तळमळ यातून झाला.पुढील कवितेतून लक्षात येईल.
पहिली माझी ओवी ग नवीन जोडप्याला मूल लवकर होऊ न देण्याला सल्ला
माझ्या ग लिंगभेद न मानण्याला
दुसरी माझी ओवी ग माता बाल संगोपनाला लसी ग
घेण्याला
तिसरी माझी ओवी ग कुटुंब
कल्याण नियोजनाला पाळणा थांबवण्यात लोकसंख्या नियंत्रणाला
चौथी माझी ओवी ग
अंगणवाडीत धाडण्याला खाऊ ग घेण्याला वजन ग करण्याला
पाचवी माझी ओवी ग शाळेत
घालण्याला प्राथमिक शिक्षण वंचित कोणी न राहण्याला
सहावी माझी ओवी ग
लग्नाच्या वयाला पात्र ते होण्याला मुलीचे १८ मुलाचे २१ वर्षाला
सातवी माझी ओवी ग
देशाच्या विकासाला आरोग्य शिक्षणाला द्या महत्त्व वरील इंदूच्या ओवीला
सप्तसूर संगीतात असतात, पण हे सप्तसूर लिहून
आरोग्याला शिक्षणाला महत्त्व देत आहेत. त्या प्रत्येक कडव्यात काहीतरी बदल
घडवण्यासाठी सांगतात. लग्न झाल्यावर लगेच मूल न होऊ देता संसार फुलला पाहिजे. मूल
झाल्यावर त्यामध्ये भेद न करता वाढवले पाहिजे. बाळ झाल्यावर मातेला पण महत्त्व देऊन
तिचे संगोपन केले पाहिजे. कुटुंब कल्याण नियोजनासोबतच लोकसंख्या नियंत्रण
अंगणवाडीतील खाऊ, बाळ कुपोषण, शालेय शिक्षण, लग्नांचे वय या सर्वातून त्या आरोग्य
शिक्षण देऊन देशाचा विकास साधनेचे अहवाहन केले आहे. ही कविता आपल्या आजच्या युगात पण
तेवढीच महत्त्वाची आहे. ग्रामीण भागात आज पण अंधश्रद्धा आहे.अशिक्षित लोक आहेत. त्यांना शिक्षणाची गरज आहे. असे कवयित्रीने वाटते.
सासुरवाशींनी मी अधिकार नाही मला केल्या कामाची गणना कशाला
उठाया झाला उशीर आटोपयेना बाई काम दिसता ताई फुटला साऱ्या अंगी घाम नाही
झाले वेळी भोजन आता काय सांगावे कारण चूक माझी होती
कुठली पोटात भीती
सासुरवाशीन ही कविता ग्रामीण जीवनावर प्रकाश टाकणारी आहे. सासुरवाशीन होणं हे काय असतं ते समाजात आजही ग्रामीण भागात अशा सासुरवाशीन आपणास पाहण्यास मिळतात. यात महिलेला कशाचाही अधिकार नाही. पडलेले सगळे काम करावे, वेळेत स्वयंपाक करावा कोणालाही तिची काळजी नसते फक्त काम काय झाले याची विचारणा करतात. यात महिला ठरवते मनाशी इथून पुढे कधीही उशीर होणार नाही व ठरलेले काम मी वेळेत पूर्ण करीन.समाजात अजूनही स्त्रीला लहान समजले जाते.
दीन दलित ते त्यांच्या कोण करी रोपा जोपा
छातीच्या खाली त्यांच्या बोटांचा हा खोपा
वाट पाहती नदी किनारी सोडील का कोणी तापा
रित्या पोटीत रागा किती डोळ्यात आसू टपा टपा
भरल्या पोटी सुचतात गप्पा टप्पा वाटतो तेवढा हा उपाय नाही साधा सोपा
दुपारची वामकुक्षी सायंकाळी घेतात झोपा
त्यांच्या पोटांचा घेर केवढा म्हणेल का कोणी मोजामापा
असा कसा हो देव बाप्पा असा कसा हो देव
बाप्पा
आजही अनेक लोक असे आहेत की, पोटभर जेवण मिळत नाहीत. श्रीमंत लोक पोट भरले तरी खातात उरलेले अन्न फेकून देतात. नदीकिनारी वाट पाहत असताना अण्णांची नदीत प्रवाहित करेल याची करतील ज्याला ताफा म्हणतात. गरीब दिवसभर उन्हात दिवसभर बसून चपले बिना चपलेचे थांबून वाट पाहतात जेवणाची श्रीमंत लोक खाऊन पिऊन कुलर खाली झोप काढतात पोटांची डेरी काढून बसतात असा प्रश्न लहान मुले देवाला विचारत आहे. ही परिस्थिती सध्या पण कोरोना काळा दिसत आहे.अशाप्रकारे कवयित्रीने विविध कविता लिहिलेले आहेत. कवितेमधून त्यांनी समाजात विविध प्रश्न मांडलेले आहेत. तसेच मनातली जी खलबल आहे ती पण त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जी आत्ताच्या समाजाला सुद्धा लागू होते. देवबाप्पा ही कविता आपल्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. कवयित्रीने संवेदनशील मनाने भाष्य केले आहे.सहजता आणि अंतर्मुखता हे इंदुताई यांच्या कवितेचे एक बलस्थान आहे.
- विशाखा देशपांडे
B.A.T.Y.
2022-23
: समन्वयक : डॉ.म.ई.तंगावार,प्रा.व्ही.जी.बिरादार,प्रा.जे.डी.संपाळे


छान!
ReplyDeleteThank you
DeleteVishakha , you are a good writer , a good daughter above all an ideal mother, hat's off to your unending efforts.👏👏🙏🙏
ReplyDeleteThank you
DeleteVery good. Keep it up. Your writing style is equally good as the poet.
ReplyDeleteThank you
DeleteThank you
ReplyDelete