माझ्या गावातील नदीची आत्मकथा

 २.माझ्या गावातील नदीची आत्मकथा -  ऐश्वर्या कांबळे       

      ( शेषनदी मौ.शेल्हाळ ता.उदगीर )


                                           होय , मी नदीच बोलते. मी शेल्हाळ या गावतील नदी आहे. माझे नाव शेषनदी आहे. मी शेल्हाळ या गावात वाहते. माझे आकार फार मोठे नाही. उदगीर पासून शेल्हाळ या गावाचे अंतर सहा किलोमिटर  आहे. शेल्हाळ या गावातील लोकसंख्या २०१२  च्या जनगणनेनुसार  २४७३ आहे. मी शेषनदी या नावाने का ओळखले जाते ? तर त्याला एक कारण आहे. 
                         मी शेल्हाळ या गावातून वाहत असतांना लोक माझ्यात कचरा टाकत आणी कपडे धुवत असत. पण गावतील शेषाबाई  नावाची एक महिला लोकांना समजावून सांगायची आणी पाणी हेच जीवन आहे, अशा प्रकारे लोकांना समजावून सांगत असे. म्हणून मला शेषनदी असे नाव देण्यात आले. शेषाबाई नावाची महिला माझी जागा खराब होऊ देत नव्हती. माझ्या पाण्यात काहीही घाण  टाकू देत नव्हती. याची ती पूर्ण दक्षता घ्यायची म्हणून तेव्हापासून मी शेषनदी या नावानेचं ओळखले जाऊ लागले. 

 


                   मी एक छोटीसी नदी आहे. मी नेहमी खळखळ आवाज करत पुढे-पुढे वाहत असते. माझा जन्म हा छोट्याशा जागी झाला. माझ्या रस्त्यात येणारे लहान -लहान प्रवाह मला येऊन भेटत गेले. म्हणून मी एका  नदीच्या रुपात बदलत गेले.मी आकाराने लहान आहे.पण माझे काम हे खूप मोठे आहे. मी नेहमी वाहतच असते. माझ्यासमोर कितीही दगडधोंडे आले असता मी कधी थांबले नाही. मी माझे मार्ग शोधत,वळण घेत नेहमी पुढे-पुढे जात असते. माझी जागा वाहतांना फारशी मोठी नाही पण मला नेहमी आनंद वाटत असायचा की मी मानवाच्या, पशु-प्राण्यांच्या उपयोगाला येते.

             माझे पात्र हे लहान आहे. आणी माझा स्वभाव हा अत्यंत चंचल आहे.मी नेहमी हसत खेळत राहते. माझ्याकडे पाहून लोकांच्या चेहऱ्यावर  देखील आनंद येत असतो. माझे मार्ग वाहतांना कधी सपाट भूमीवरुन तर कधी आडवळनातून मी पुढे- पुढे वाहत गेले. मी कधीच थांबले नाही.कधी-कधी माझा स्वभाव शांत होतो.माझे रुप जागोजागी बदलत असतात.मला नेहमी कुठे ना कुठे कोणी ना कोणी विविध प्रकारचे नाव देत असतात. मला अनेक नावाने ओळखले जाते. मी सर्वांच्या गरजा भागवत असते. 

                विविध सणाला माझी लोक श्रद्धेने पूजा देखील करतात. मला पवित्र मानतात. मी माझे पाणी लोकांना नि: स्वार्थ भावनेने दयायचे. त्यांची पाण्याची गरज भागवायचे. माझा लोकांना खूप उपयोग व्हायचा. मी माझे पाणी सर्वाना दयायचे त्यांना कधीच त्रास दयायचे नाही. मी मानवजातीच्या प्रत्येक कार्यात कामाला येत असत. असे माझे कार्य आहे.

                    माझ्या सोबत लहान मुले  अगदी मनसोक्त खेळायचे आणी त्यांना खूप आनंद व्हायचा. मी माझे पाणी सर्वाना देऊन त्यांच्या गरजा भागवत असत. पण  काही लोकांनी माझे पात्र खराब करण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या पाण्याला दूषित करण्याचा प्रयत्न केला. पण  मी त्यांनच्यावर कधी रागवले नाही. त्यांना कधी पाणी देणार नाही  असे म्हणले नाही. माझ्यामुळे गावतील लोकांना खूप मदत व्हायची. अगदी मनसोक्त होऊन मी मानवांना,पशू- पक्ष्यांना माझे पाणी दयायचे.त्यामुळे मला देखील खूप आनंद व्हायचा.

                आज  माझ्यावर आजू- बाजूंच्या परिसरातील लोकांना पाणी देण्याची जबाबदारी आहे. लोक माझा वापर करुन आपली उपजीविका भागवत असतात. मानव जातीच्या कल्याणासाठी माझा खूप वापर केला जातो. पूर्वी माझे पाणी हे गावतील लोक पिण्यासाठी वापरायचे. मला अत्यंत पवित्र मानले जायचे. परंतू,काही दुष्ट लोकांनी माझ्या पाण्याला दूषित करण्याचा प्रयत्न केला.मला अपवित्र करण्याचा प्रयत्न केला. माझ्या पाण्यात घाण टाकणे,भांडी घासणे,कपडे धुणे,पशू-पक्ष्यांची अंघोळ अशा सर्व गोष्टी  करत असत.अशा प्रकारे मला दूषित करण्याचे प्रयत्न करत गेले. आता माझ्या पाण्यात सांडपाणी, कचरासुद्धा टाकला जातो. आज माझे पाणी हे अपवित्र झाले आहे.

                     लोक आपल्या सुख सोईसाठी, गरजा भागविण्यासाठी देखील माझा गैरवापर करत असे. मला त्रास देत असत. माझा प्रवाह रोखत असत. आणी माझा प्रवाह रोखल्यामुळे जलप्रदूषण होत आहे. माझे पवित्र स्थान अपवित्र होत चालले आहे. मी दूषित होत  चालले आहे. नेहमी वाहत राहणे, सर्वाना मदत करणे हे माझे कर्तव्य आहे.मनुष्य कितीही माझ्या विरोधात वागत असेल तरी मी माझे अस्तित्व संपेपर्यंत मानव जातीची सेवा करणार असे मला वाटत असे. पण  काही दुष्ट लोकांनी माझ्या अस्तित्वाचा गैरफायदा घेऊन माझे अस्तित्व स्वत:च्या फायदयासाठी संपवून टाकण्याचा प्रयत्न केला. आणी माझे जे कर्तव्य होते ते  अधुरे राहिले. 

            माझे अस्तित्व संपवून टाकल्यामुळे मी आज शेल्हाळ या गावात राहत नाही. लोकांना मदत करणे, त्यांना पाणी देणे त्यांची  सेवा करणे हा माझा स्वभाव होता.पण  काही लोकांना ते आवडत नसत. म्हणून लोकांनी माझा विचार  करावा. मी तर कुठे चुकले नाही. जल हे जीवन आहे.हे लोकांना समजले पाहिजे. पण लोकांना ते समजायला खूप वेळ लागेल.'जेव्हा तहानेले ऊर दाटे तेव्हा पाणी अमृत वाटे' ही वेळ केव्हातरी येईल.

                                                                                                                                                                         नाव : ऐश्वर्या दामाजी कांबळे

                                                                                    बी.ए.प्रथम वर्ष  वर्ष : २०२२-२३

                : समन्वयक : डॉ.म.ई.तंगावार,प्रा.व्ही.जी.बिरादार,प्रा.जे.डी.संपाळे                                                                                                                                                                                                                 

     

                                                                                                   







                                                                                                                         





   



                                                                                                                

                                                                                                                 

Comments

  1. छान लिहिलं आहे, उत्तम शब्द मांडणी. अनेक शुभेच्छा 💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ऐतिहासिक खरोसा लेण्या

रवी बापटले यांचे एड्स ग्रस्तांसाठीचे सेवालय

Lucky : A Special Member of Our Family