कोरोनाकाळ आणि माझं गाव

 १. कोरोनाकाळ आणि माझं गाव : कु.अक्षिता नरवटे

        मार्च महिन्यात २०१९ मध्ये आमचे कॉलेज सकाळच्या सत्रात भरू लागले होते. एके दिवशी सरांनी आम्हाला सांगितले की, कोरोनामुळे तुम्हा सर्वांना सुट्टी मिळेल. तेव्हा आम्ही विद्यार्थी फारच गोंधळलो. आणि अभ्यासाच्या टेन्शनने परेशान झालो. हा नवीन विषाणू आल्याने आम्ही फारच अस्वथ झालो.सुट्ट्या लागल्यास असे वाटायचे की, आता अभ्यास नसल्याने मुक्त झालोत. अभ्यासाची गरज नाही. रट्टा पट्टा नाही. पण असे करून कसे चालणार? आमच्या भविष्याचे काय होणार असे विचार मनामध्ये येत होते. ही महामारी तर हात धुऊन आमच्या मागे पडलेली. आम्हाला घरच्या बाहेर कोठेच जाता येत नव्हता.' ना मामाचं गाव ना मावशीचं गाव गप्प बसा घरचा खात.'अशी कथा झाली होती. शहरात राहणाऱ्या लोकांची गावाकडे जाण्याची गर्दी गोंधळ अशाने हा विषाणू मोठ्या भरभराटीने वाढू लागला होता.

     महाराष्ट्रात कोरोनाचा रुग्ण आढळल्याने व नंतर त्यात वाढ झाल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य सरकारने शाळा कॉलेजेस महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला.२२ मार्च २०१८ रोजी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब  यांनी जनता कर्फ्यू व त्या नंतर २५ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर केले. कोरोना  विषाणू संक्रमित होतो. रुग्णाच्या संपर्कात एखादी व्यक्ती असल्यास कोरोनाचा प्रसार वेगाने होतो. त्यामुळे या कोरोनाची साखळी तोडणे व कोरोनावर नियंत्रण मिळवणे, यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. कोरोनामुळे मनात किती भीती निर्माण झाली होती. त्यात दररोजच्या टीव्हीवरच्या बातम्या ऐकून, पाहून तर खूपच भयभीत झालो होतो. 

        चीनमधील वूहान येथे जन्मलेला हा विषाणू. या विषाणूने साऱ्या जगात पाय पसरलेला होता. आणि तोच विषाणू पुण्यात महाराष्ट्रात देखील दाखल झाला होता. त्यामुळे हा विषाणू माझ्या  गावात, माझ्या घरात तर प्रवेश करणार नाही ना? असा प्रश्न मला सतवू लागला होता. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, कोरोना विषाणू पासून स्वतःला सांभाळा, नियमित वापराच्या वस्तू स्वच्छ करा, कोरोनाचा फैलाव दूर करा. असे प्रत्येक जण सांगत होते.

      माझे नरसिंगवाडी  हे गाव उदगीर पासून १४ किलोमीटर अंतरावर लोहारच्या बाजूला आहे. माझ्या गावची लोकसंख्या जेमतेम ३०० आहे. हे छोटेसे सुंदर व आदर्श गाव.आमच्या गावात लॉकडाऊन घोषित होताच आम्ही फारच गोंधळलो. गावात वातावरण अगदी शांत झाले होते. माझे घर गावाच्या सुरुवातीलाच आहे. त्यामुळे माझ्या घरापासून गावात जाण्याचा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे तोच रस्ता सर्वप्रथम बंद केला गेला. माझ्या घरापुढे एक बाभळीचे झाड आहे. त्या झाडाला एक मोठी दोरी बांधली आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक काठी लावली आणि त्या काठीला ही दोरी बांधली. म्हणजे गावातला कोणी माणूस बाहेर जाऊ नये आणि बाहेरचा आत येऊ नये यासाठी. गावातील सरपंचांनी अशी युक्ती लढवली की, त्या झाडाखाली दोन बसण्यासाठी बाकडे टाकले. व दररोज दोन टाईम दोन व्यक्ती तेथे नियंत्रण ठेवत बसायचे. अशी नोकरी चालू केली होती. त्यासाठी त्यांनी नोकरी करण्यास व्यक्तींना त्यांची स्वतःची ओळखपत्र तयार करून दिले होते. या नोकरीचे नाव अँटी कोरोना नियंत्रण फोर्स असे आहे. हे कार्य ग्रामपंचायत तर्फे आहे. मग हे लोक गावातील बाहेर राहणाऱ्या व्यक्तींना   पण गावात प्रवेश देण्यास मनाई करू लागले. त्यांची टेस्ट करून गावात प्रवेश घेऊन सात दिवस क्वारंटाईन करू लागले. मास्क,सॅनिटायझर, हँडवॉशचा अति प्रमाणात वापर करू लागले. 'आपले रुपये होतात वेस्ट मास्क सॅनिटायझर सगळ्यात श्रेष्ठ.' 

           एखादी व्यक्ती शिंकली किंवा खोकलली असता गावातील लोक त्या व्यक्तीकडे वेगळ्या दृष्टीने पाहत असत. त्यांना असे वाटायचे की, त्यांना कोरोना झाला  आहे,असे समजायचे.आणि त्या व्यक्तीला कोणाच्याही संपर्कात येऊ देत नसत. त्याला एका खोलीत ठेवायचे आणि त्याच्याजवळ कोणीच जायचे नाही  'सर्दी खोकला आणि ताप नका करू हो दुर्लक्ष ' हे लक्षणे गावात कोणत्या व्यक्तीला आढळली, तर त्या व्यक्तीने त्वरित करून टेस्ट करणे खूप महत्त्वाचे झाले आहे. या विषाणूचा प्रसार थोड्या प्रमाणात थांबला. या काळात या कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची खूप जास्त प्रमाणात भीती वाटू लागली पण कोरोना झालेल्या व्यक्तीला मानसिक त्रास खूप होऊ लागला होता. ग्रामपंचायती मार्फत निर्जंतुकी करण्याची फवारणी करण्यात आली. घरोघरी मास्कचे  वाटप करण्यात आले. गल्लोगल्ली संदेशाचे बॅनर लावण्यात आले.गावात दवंडी देण्यात आली.आमच्या गावातील सर्वजण कोरोनाविरुद्धची ही लढाई जिंकण्यासाठी स्वतःला सैनिक समजून लढू लागले. म्हणजेच शासन निर्देशाचे  तंतोतंत पालन करू लागले. योग्य ती खबरदारी घेऊ लागले. यासाठी सर्वात मोठा मूलमंत्र आम्ही पाळला. ' घरी रहा सुरक्षित रहा'!

         आमच्या गावात सरपंचांनी तसेच इतर सदस्यांनी तर स्वतःच्या नोकऱ्या लावून घेतल्या होत्या . गावाच्या प्रवेश मार्गावर बसण्याच्या ग्रामपंचायतीने तेथेच सॅनिटायझर व गेट बनवून घेतले. जे शेतकरी, शेतमजूर शेतात जातात. त्यांच्यासाठी तसेच बाहेरगावी येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून खबरदारी घेतली होती. अगोदर निर्जंतू व्हावे यासाठी बाहेर गावच्या प्रत्येक व्यक्तीला गावात प्रवेश केल्या केल्या रोखण्यात आले. तसेच आमच्या गावातील शाळेतील शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका  हे देखील ग्रामस्थांमध्ये या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करत होते. कोरोनाच्या या संकटातच  ग्रामपंचायत सरपंच आम्ही सर्व गावातील लोक सर्वांची कशी काळजी घेत आहेत हे समजले. या काळात लोकांची अति प्रमाणावर मृत्यू होऊ लागले आणि  या विषाणूने तर  सगळं जगचं हलवलं. सर्व रुग्ण दवाखाण्यात. ऑक्सिजन कमी पडू लागला. वेंटीलेटरची टाकी पैसे देऊनही मिळत नसे.रेमिडेसीवर इंजेक्शन मिळविण्यासाठी धावपळ चालू होती. रुग्णालयात थांबायला जागा नव्हती.लोक अशी जमिनीवर खाली त्रासाने लोळत पडत होते . जगातील सर्व डॉक्टर व लोक या बिमारीला इलाज करू शकत नव्हते. याचे आमच्यासारख्याना आश्चर्य वाटत होते. विलाजासाठी  डॉक्टर कमी पडू लागले. रोगांची संख्या वेगाने वाढू लागली .रुग्णाला कोरोना झाल्याचे कळल्यास भीतीने अर्धे लोक तर तेथेच आपले प्राण गमावू लागले. एवढी दुर्दैवी अवस्था माणसाची कधीच झाली नव्हती .अशी अवस्था प्रथमच झाली होती. 

         या काळात माणस माणसाच्या जवळ जाण्यास भिऊ लागले. एकमेकांना बोलण्यास भिऊ लागले.कोणी कोणाच्या घरी जात नव्हते. बाहेरच्या वस्तू घेत नव्हते. काही वस्तू किंवा किराणामाल आणल्यास बाहेर उन्हालाच ठेवत असत .बाहेर गावाहून कोणी घरचे आले तर अंघोळ करून घरात येत होते. आणि मोटार सायकलला पण धुवून घ्यायचे. आपले स्वतःचे कपडे गरम पाण्यात भिजवून ठेवायचे. कोरोना काळात रुग्णाला फोनच्या माध्यमातून बोलावे लागायचे. त्यांना हाच आधार होता. कारण त्यांच्याजवळ जाणे शक्य नव्हते. त्यांची सहानुभूती फक्त फोनच्या माध्यमातूनच करावी लागायची. आपल्याला आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी पोषक आहार घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे .हा आजार मधुमेह, अस्थम व आणखी काही आजार असणाऱ्या व्यक्तींना तसेच लहान मुले व वृद्ध माणसांना या विषयांची लवकर लागण होऊ लागली. या लोकांना सर्वात जास्त काळजी घ्यावी लागायची .आपल्या देशाचे डॉक्टर ,नर्स ,आरोग्य कर्मचारी, पोलीस ,सफाई कर्मचारी यांनी कोरोना व्हायरस विरुद्ध खूप लढण्यासाठी रात्रंदिवस दिवस प्रयत्न करीत होते. 

               माझ्या घरचे आम्हाला बाहेर जाऊ देत नव्हते. कोणाला बोलू देत नसत. आणि आम्ही जर शेजारच्या घरी गेलो, तर रागवायचे आणि समजायचे की बाळांनो हा आजार फार भयंकर आहे. लहान मुलांना लवकर होतो.तर तुम्ही सांभाळून राहा. कुठेही जाऊ नका. बाहेर दुकानचे काही खाऊ नका,असे सांगायचे .सातवी पिढ्या बसून खाणार आहे असे म्हटले जायायचे. ती पिढी आपलीच आहे की काय ? असे वाटत होते.या व्हायरससाठी सरकारने अनेक नियम लागू केली आहेत. त्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आपली  जबाबदारी आहे. या संदर्भात मला असे म्हणावे वाटते की, ' कोरोनाची लवकर करा टेस्ट नाही तर पैसे जातात वेस्ट हा आजार बनला गेस्ट डॉक्टर करतात सर्वांची पेस्ट ' कोरोना काळात आम्ही हे नियम नियमितपणे पाळलेत.नेहमी बाहेरुन आल्यानंतर आपले हात २०-३० सेकंद धुवायचे.बाहेर जाताना नेहमी मास्कचा वापर करायचे.आपल्या हाताचा स्पर्श नाक , तोंड, डोळे यांना होणार नाही याची काळजी घेतली. गर्दीच्या ठिकाणी न जाणे.आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवलोत.असे नियम आम्ही वेळेवर करायचो.

        १५ जून २०२१ हा दिवस उजाडला. ज्या दिवशी आमचं  महाविद्यालय  उघडते पुढच्या वर्गाची सुरुवात होते.असे वाटत होते, पण असे काहीही झाले नाही.आशा ही माझ्या मते माणसास  लाभलेली दैवीशक्ती आहे. संकट कितीही मोठे असू द्या आपणाजवळ सकारात्मक विचार  असतील, तर आपण त्या संकटाचा नक्कीचं सामना करु शकतो. आमच कॉलेज बंद आहे. मात्र आमचे शिक्षक व्हाट्सअपद्वारे  शैक्षणिक व्हिडिओ पाठवत ऑनलाईन क्लास घेत होते. ' दूर कर हे संकट, दयाळू, दयाघन पूर्ण कर माझी मनोकामना छान पैकी सुरू होऊ दे माझ कॉलेज.हे निसर्ग निर्मिता  संकट दूर कर आता ' ही प्रार्थनारूपी सगळ्यांच्या भावना निसर्गाने ऐकल्या आणि कोरोना कमी झाला. भीत भीत का असेना आम्ही कॉलेजला जाऊ लागलो होतो. आता कोरोना कधीच येऊ नये,अशी प्रार्थना सतत करीत होतो.

     : समन्वयक : डॉ.म.ई.तंगावार,प्रा.व्ही.जी.बिरादार,प्रा.जे.डी.संपाळे                                                                                                                                                                                          

                                                                 नाव:  अक्षिता परमेशवर नरवटे
                                                                 वर्ग: B.Com.T.Y.
                                                                 वर्ष: २०२२-२३
                                                                     ( या विद्यार्थिनीचे एकूण ५३ कविता अप्रकाशित आहेत.)

Comments

  1. हार्दिक अभिनंदन!

    ReplyDelete
  2. Akshita chan lihile ahes. Tuzya bhavi lekhnas khup subhechha.

    ReplyDelete
  3. Tai khup chan lihila ahaat 😊 tai Tumhi na ya pudhil lekh madhe veg vegle templets use kara aani mg modifie kara tumhala free bhetun jatil. Mnje tumchya ntr yenarya lekhacha views pahun google tumhala adcence provide karel aani mg tumhala tumchya mehanaticha fal pn bhetel. Mi tumhala mi 2021 la lihilela link takto jr tumhala tyatun kahi hava aasel idea tr tumhi te use kara.. Pn hasu naka plz 😊😊 https://todayluck1.blogspot.com

    ReplyDelete
  4. छान लिहिलं आहे, शुभेच्छा 💐💐

    ReplyDelete

Post a Comment